टीम सिटी टाइम्स लाखनी : तलावात पोहायला गेलेल्या एका 22 वर्षीय तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना लाखनी तालुक्यातील ग्राम गोंडसावरी येथे (दी.18) ऑक्टोबर रोजी सायंकाळी (5:30) वाजताच्या सुमारास उघडकीस आली आहे. वीरेंद्र हरिभाऊ राऊत वय (22) रा. गोंडसावरी असे मृतक तरुणाचे नाव आहे.
या घटनतील, तरुण गावातीलच प्रख्यात असलेल्या मामातलाव येथे अंघोळ करण्याकरिता गेला होता. दरम्यान, तलावाच्या पण्यात उतरून अंघोळ करतांना तलावाच्या सिमेंट पायरीवरुन पाय घसरले होते. मात्र, वीरेंद्रला पाण्यात पोहता येत नसल्यामुळे पाण्यात बुडून त्याचा मृत्यू झाला. या घटनेमुळे, गावात शोकाकुळ वातावरण निर्माण झाले आहे.
याप्रकारणी सुभाष राऊत यांच्या फिर्यादीवरून लाखनी पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद कारण्यात आली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक हृदयनारायण यादव यांच्या मार्गदर्शनात पोलीस महिला पोलीस खोमवती ढोके हे करीत आहेत.