टीम सिटी टाइम्स लाखनी | संपूर्ण विश्वातील आदिवासींचे अस्तित्व, अस्मिता, विशिष्ठ ओळख,संस्कृती, आत्मसन्मान, जल जंगल जमीन व इतिहास सभा अधिकारांच्या संरक्षणाची व समस्यांची उकल करण्यासाठी प्रबोधन मार्गदर्शनासाठी संयुक्त राष्ट्र संघाने भारतासह सर्व देशांला दिलेल्या निर्देशानुसार दि.९ ऑगस्ट हा जागतिक आदिवासी दिवस लाखनी येथील बडगे सेलिब्रेशन हॉल येथे ऑल इंडिया आदिवासी एमप्लाईज फेडरेशन शाखा- लाखनीच्या वतीने साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. दिपचंद सोयाम यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आदिवासी फेडरेशनचे जिल्हाध्यक्ष गोवर्धन कुंभरे हे होते.
प्रमुख अतिथी म्हणून सहाय्यक आयुक्त डॉ. सुधाकर झळके, डॉ. किशोर कुंभरे, डॉ. अविनाश नान्हे, प्रा. प्रमोद वरखडे, सेवानिवृत्त तहसीलदार निवृत्ती उईके, डॉ. सोहन मरस्कोल्हे, डॉ. मधुकर कुंभरे, ज्ञानेश्वर मडावी, डॉ. राजेश मडावी, डॉ.अवंती मडावी, गौरीशंकर सलामे, सरपंच तेजराम धुर्वे,कांचन वरठे, डॉ. भूपेंद्र धूर्वे आदी मान्यवर उपस्थित होते.
सकाळच्या सत्रात लाखनी नगरीत भव्य मिरवणूक काढण्यात आली.यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.तसेच विविध आदिवासी नृत्य सादर करण्यात आले. आदिवासी समाजाच्या समग्र विकास, प्रगतीसाठी, एकजूट राहण्यासाठी या जागतिक आदिवासी दिनाचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमाला तालुक्यातील मोठया संख्येने आदिवासी बांधव उपस्थित होते.