अतुल नागदेवे लाखनी | आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर लाखनी शहरात कार्यकर्ता मेळावा दि. १२ ऑगस्ट रोजी शहरातील संताजी मंगल कार्यालय येथे आयोजित करण्यात आला होता. यावेळी प्रकाश बाळबुधे हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.
उपस्थितांना मार्गदर्शन करताना प्रकाश बाळबुधे म्हणाले की, लोकसभा निवडणुकी नंतर प्रथमच लाखनीत मेळावा घेतला असून, लोकसभा निवडणूक आपण हरलो असलो तरी, केंद्रात आणि राज्यात आपले सरकार आहे. त्यामुळे आपण पुन्हा एकदा नव्या ताकदीने लढू. येणारी विधानसभा निवडणूक ग्रामपंचायत पातळीवर लढायची आणि विरोधकांना जशास तशी उत्तर देयाची असे ते, म्हणाले.
कार्यकर्त्यांनी लोकसभेच्या पराभवाचा बदला येत्या विधानसभेत काढले पाहिजे. विरोधकांना जशास तसे उत्तर आपण द्यायला पाहिजे असे स्पष्ट वक्तव्य भंडारा जिल्ह्याचे भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रकाश बाळबुधे यांनी मेळाव्याप्रसंगी केले. या मेळाव्याला लाखनी तालुक्यातील भाजप नेते, तथा पदाधिकारी कार्यकर्ते, महिला, बुथप्रमुख मोठ्या संख्येने उपस्थित होते.
योजना नागरिकांना पोहोचवा : प्रकाश बाळबुधे
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, वयोश्री योजना या महत्त्वपूर्ण योजनांची जाणीव लोकांना करून दिली पाहिजे शेतकऱ्यांसाठी या सरकारने मोठे निर्णय घेतले आहेत. शेतकऱ्यांना वीज थकबाकी माफ केली आणि येणाऱ्या काळात वीजेचे बिल शेतकऱ्यांना लागणार नाही याची काळजी सरकारणे घेतली आहे. पुढील काळात सौर ऊर्जेचा मोफत वापरही शेतकऱ्यांना करता येणार आहे. तसेच, १% व्याजाने शेतकऱ्यांना पिकविमा कर्ज मिळणार. अशी माहिती बाळबुधे यांनी दिली.
सदर मेळाव्याला बाळाभाऊ अंजनकर, माजी आमदार बाळाभाऊ काशिवार, माजी जिल्हाध्यक्ष शिवरामजी गिर्हेपुंजे, डॉ. श्याम झिंगरे, रेखताई भाजीपाले, भुसारी, हेमंत देशमुख, पद्माकर बावनकर, डॉ. सुदाम शहारे, घनश्याम खेडीकर, डोळे, श्रावण कापगते, सत्यवान वंजारी, मनिष वंजारी, सुधाकर हटवार, घनश्याम मते, शरद निर्वाण, सुधीर राघोर्ते, विक्रम रोडे उपस्थित होते.