टीम सिटी टाइम्स लाखनी : पोलीस ठाणे लाखनीच्या हद्दीतील एका गावात अज्ञात इसमाने एका 14 वर्षीय अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेल्याची घटना (दी.7) ऑक्टोबर रोजी सकाळी १०:०० वाजता दरम्यान घडली. याप्रकरणी पिडीत मुलीच्या बहिणीच्या फिर्यादीवरून लाखनी पोलिसांत अज्ञात इसमाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
साकोली हे तालुक्याचे ठिकाण असून जिल्ह्यातील शिक्षणाचे माहेरघर संबोधले जाते. या घटनेतील पिडीत 14 वर्षीय अल्पवयीन मुलगी ही साकोली येथे एका नामांकित विद्यालयात इयत्ता नवव्या वर्गात शिक्षण घेत होती.
दरम्यान, लाखनी तालुक्यातील एका गावातून कोणीतरी अज्ञात इसमाने फुस लावून पळवून नेले. या, घटनेची माहिती घरच्या मंडळीना मिळताच तिच्या मैत्रिणीकडून विचारपूस केली. पण मिळून न आल्याने मोठ्या बहीनेने पोलीस ठाणे गाठून आपबिती सांगितले.
पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून क्षणाचाही विलंब न लावता अल्पवयीन मुलीचे वर्णन घेऊन जिल्ह्यातील सर्व पोलिस ठाण्यांना वायरलेसद्वारे सूचना केली. तथा अज्ञात इसमाविरुद्ध कलम 137, (2) भारतीय न्याय संहिता अन्वये गुन्हा दाखल केला असून पोलीस निरीक्षक हृदयनारायण यादव यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील सोनवाने तपास करीत आहेत. वृत्त लिहीपर्यंत पोलिसांकडून कुमारिकेचा शोध घेण्याचे काम सुरू होते.