टीम सिटी टाइम्स भंडारा : आठवडी बाजारात भाजीपाला घेण्यासाठी गेलेल्या इसमाची दुचाकी अज्ञात चोरट्याने पळवुन नेल्याची घटना (दी.27) सप्टेंबर रोजी घडली होती. दरम्यान, रमेश विटाबा खेडकर (वय 50) रा. सानगडी यांच्या फिर्यादीवरून साकोली पोलिसांत अज्ञात आरोपी विरुद्ध (दी.29) रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या घटनेतील फिर्यादीने सानगडी येथील पंडित जवाहरलाल नेहरू शाळा परिसरात रस्त्याच्या कडेला दुचाकी लावून आठवडी बाजारात भाजीपाला खरेदीसाठी गेला असता, कोणीतरी अज्ञात इसामने सुना मोका पाहून दुचाकी पळवली होती.
परिसरात वारंवार दुचाकी चोरीच्या घटना घडत असल्याने नागरिक हैराण झाले असून, पोलिसांनी गोपनीय यंत्रणा सक्रिय करून दुचाकी चोरांचा शोध घेत, या घटनेतील दुचाकी चोरट्याना जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले असून, रवींद्र चतुभुर्ज वैद्य (वय 48) मनोज लोकचंद नागपुरे (वय 36) दोन्ही रा. सानगडी असे पोलिसांनी जेरबंद केलेल्या दुचाकी चोरट्याचे नाव आहे. या घटनेतील चोरट्यानी चोरींची कबुली देत लपवून ठेवलेली दुचाकी पोलिसांच्या स्वाधीन केली.
दोन्ही आरोपितांवर साकोली पोलिसांत कलम 303, (2) भारतीय न्याय संहिता अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, (दी.5) ऑक्टोबर रोजी न्यायालयात हजर करण्यात आले होते. याप्रकरणी, साकोली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय गायकवाड यांच्या मार्गदर्शनात अधिक कारवाई महादेव मडावी, मधुकर शेंडे, गोविंद शिंदे हे करीत आहेत.