टीम सिटी टाइम्स भंडारा | शहरातील जकातदर शाळा परिसरात पोलीस अधिकारी,कर्मचारी गस्तीवर असतांना एक अनोळखी २२ वर्षीय तरुण रोडवर त्याच्या ताब्यातील दुचाकीस चावीने सुरु बंद करीत होता.
दरम्यान,पोलिसांना त्यावर संशय आला.शहानिशा केली असता सदर दुचाकी,चोरी गेल्याबाबत भंडारा पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध कलम ३०३(२) भारतीय न्याय संहिता अन्वये गुन्ह्यांची नोंद मिळून आली. समीर सिकंदर उईके (वय २२वर्षे, रा.खात रोड,भंडारा)असे आरोपीचे नाव आहे.
भंडारा उपविभागीय पोलीस अधिकारी,कर्मचारी गस्तीवर असतांनी या घटनेतील आरोपी समीर उईके त्याच्या ताब्यातील सुझुकी कंपनीची नवीन ॲक्सेस दुचाकी (मोपेड) क्रमांक (एम.एच३६/ ए.एन ७२४१) रस्त्यावर सुरु बंद करीत होता. दरम्यान,पोलिसांना संशय आला.दुचाकीची शहानिशा केली असता भंडारा पोलिसांत गुन्ह्यांची नोंद मिळून आली.
सदर गुन्ह्यातील नोंद माहितीच्या आधारावरून या घटनेतील आरोपी समीर उईके याचेवर भंडारा उपविभागीय पोलीस पथकाने रीतसर कारवाई करीत, त्याच्या ताब्यातील दुचाकी जप्त केली.
सदर, कारवाई पोलीस अधिक्षक नुरूल हसन,अप्पर पोलीस अधिक्षक ईश्वर कातकडे, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.अशोक बागुल यांच्या मार्गदर्शनात साजन वाघमारे, शुभास राठोड, वैभव काळे,रोहन काळे, विजय राघोर्ते यांनी केली आहे.