टीम सिटी टाइम्स लाखनी | वनपरिक्षेत्र अंतर्गत येणाऱ्या बिट मुरमाडी/तूप अधिनस्त मिरेगाव येथे गाव तलावात दोन तृणभक्षी वन्यप्राणी चितळ पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना दि. 29 ऑगस्ट रोजी उघडकीस आली. या घटनेची माहिती गावातील सरपंच यशस्वी नंदेश्वर यांचेसह गावकऱ्यांनी वनविभागाला दिली.
वनपरिक्षेत्र अधिकारी एस.पी गोखले यांच्या मार्गदर्शनात वनविभागाची चमू घटनास्थळी दाखल झाली. गावकऱ्यांच्या मदतीने तलावातील बुडालेल्या दोन्ही चितळाला पाण्यातून बाहेर काढण्यात आले. मात्र, दोन्ही चितळ मृत अवस्थेत आढळून आले.
दरम्यान, पशु वैद्यकीय अधिकारी राजेश यमपुरे मुरमाडी-तूप यांनी मृत चितळाचे शवविच्छेदन करून प्राथमिक अंदाजानुसार दोन ‘नर चितळामध्ये झुंज झाल्याने तसेच रानकुत्र्यांचे नखाचे ओरखंडे वरून रानकुत्र्यांनी प्राण वाचविण्याच्या प्रयत्नात पाण्यात उडी घेतल्यामुळे मृत झाल्याचा असा प्राथमिक अंदाज वर्तविला जात आहे. शवविच्छेदन केलेले दोन चितळ पशु अधिकारी समक्ष शव भुगाव रोपवन जंगलातील खड्ड्यात पुरण्यात आले.
यावेळी क्षेत्र सहायक जे.एम बघेले लाखनी, चंदू कुटारे वनपाल जकास लाखनी अश्विनी रंगारी बिट वनरक्षक राजेश यमपुरे पशुवैद्यकीय अधिकारी, वनरक्षक दिनेश बोरकर, वनरक्षक मंगला शहारे गडेगाव, यशस्वी नंदेश्वर सरपंच ग्राम मिरेगाव, शुभम मेश्राम, यादव लांजेवार तसेच गावकरी यांचे समक्ष दफन विधी पूर्ण करण्यात आले. यावेळी मृत चितळाची आठवण म्हणून वडाचे झाड लावून वृक्षारोपण करण्यात आले.