टीम सिटी टाइम्स भंडारा | महिला सशक्तीकरण करण्याच्या उद्देशाने राज्यातील महिला आणि मुलींना आत्मनिर्भर बनवण्यासाठी महाराष्ट्र शासनाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली. या योजनेंतर्गत विवाहित, विधवा, घटस्फोटित, परिक्तत्या, निराधार महिलांना दरमहा १५०० रुपये देण्यात येत आहेत.
या योजनेसाठी, दी. १ जुलै पासून अर्ज प्रक्रिया सुरू झाली असून, अवघ्या ४५ दिवसात लाखनी तालुक्यातील २९ हजार महिलांनी अर्ज सादर केले आहेत.
दोन महिन्याचा लाभ घेण्यासाठी ३१ ऑगस्ट पर्यत अर्ज करण्याची शेवटची तारीख असल्याने ज्यास्तीत ज्यास्त महिलांनी सहभागी होण्याची आवाहन भाजपा जिल्हा अध्यक्ष तथा साकोली विधानसभा क्षेत्राचे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना समितीचे अध्यक्ष प्रकाश बाळबुद्धे यांनी केले आहे.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेचा लाभ घेण्यासाठी आतापर्यंत तालुक्यातील २९ हजार १२६ महिलांनी ऑनलाइन अर्ज केले आहे. याशिवाय, ऑफलाइन अर्ज देखील प्राप्त झाल्याने लाडक्या बहिण योजनेला प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे.
या योजनेसाठी ग्रामीण भागातील महिलांना ग्रामसेवक किंवा अंगणवाडी सेविकांकडे नोंदणी करावी. तर, शहरी भागातील महिलांना नोडल अधिकारी यांच्याकडे लाडकी बहिणींनी त्वरीत ऑनलाईन अर्ज करावा.
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची विधानसभेत घोषणा केली. सदर योजना राज्यातील महिला आणि मुलींसाठी राबविली गेली असल्याने योजनेंतर्गत राज्यातील महिलांना दरमहा १ हजार ५०० रुपये १४ ऑगस्ट पासून महिना वितरीत करण्यात आला आहे.
योजनेसाठी ४६ हजार कोटींच्या निधीची तरतूद अर्थसंकल्पात करण्यात आली आहे ही योजना कधीही बंद होणारी नसून विरोधी पक्षातील नेते योजना बंद होणार याबाबतचा खोटा प्रचार करीत आहेत.
अशी माहिती प्रकाश बाळबुध्ये यांनी दिली. पात्र बहिणींनी जुलै महिन्याचा लाभ घेण्यासाठी ३१ ऑगस्टपर्यंत अर्ज नोंदणी करून योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन भाजपा जिल्हाध्यक्ष प्रकाश बाळबुद्धे यांनी केले आहे.
लाडक्या बहिणींच्या खात्यात निधी जमा होणे सुरु!
माझी लाडकी बहीण योजनेसाठी आतापर्यंत ज्या महिलांनी अर्ज सादर केला. यातील पात्र महिला लाभार्थ्यांची दोन महिन्याचे ३ हजार रुपये महिलांच्या खात्यात पैसे जमा सुरू झाले आहे, सप्टेंबरपासून प्रत्येक महिन्याच्या १५ तारखेला महिलेच्या खात्यात १५०० रु. महिना जमा नियमित होणार आहे, अशी माहिती बाळबुद्धे यांनी दिली आहे.
विषय म्हणजे, काही महिलांचे बँक खात्याशी आधार सिडिंग झाली नसल्याने सध्या काही निवडक महिला अपात्र झाले असलेतरी त्याही पात्र होणार आहेत अशी माहिती यावेळी बाळबुद्धे दिली.