टीम सिटी टाइम्स लाखनी | तालुक्यातील 8 किमी अंतरावर असलेल्या परसोडी, सालेभाटा शिंदीपार व मुंडीपार शेतशिवारात खुर्शीपार बांध येथील जाणारा कॅनल फुटल्याने शेतकऱ्यांची हजारो हेक्टर जमीन पाण्याखाली गेल्याने नुकताच केलेल्या धान लागवडीची मोठया प्रमाणात हानी झाल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले असल्याने नुकसान भरपाई त्वरित देण्याची मागणी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी केली आहे.
दि.28 जुलैच्या मध्यरात्रीपासून पडलेल्या मुसळधार पावसामुळे सालेभाटाकडे जाणारा कॅनल पूर्ण भरला होता. यामध्ये शेता शेजारील कॅनल फुटून या कॅनलचे पाणी परसोडी,सालेभाटा शिंदीपार व मुंडीपार शेतशिवारात शिरल्याने शेताला भगदाड पडल्याने यात शेताचे प्रचंड नुकसान झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.शेतात पिकवलेला शेतमाल यात नष्ट झाला.चक्क शेतातच भगदाड पडल्यामुळे भविष्यात या जमिनीवर शेती करणे अशक्य झाले आहे. या नुकसाणीसाठी पाटबंधारे विभाग जबाबदार असून त्यांनी शेती दुरुस्त करून द्यावी अशी पिडीत शेतकऱ्यांची मागणी आहे.
लाखनी तालुक्यातील परसोडी ग्रामपंचायत हद्दीत येणारा खुर्शीपार येथील जंगलात तलावाची निर्मिती तयार केले असून तलावाचे पाणी शेतकऱ्यांना मिळावे या उदात्त हेतूने 1983 सालीं सालेभाटाकडे जाणारे कॅनल तयार करण्यात आले असून सनियंत्रण, देखरेख,दुरुस्तीची जबाबदारी पाटबंधारे विभागाची असलीतरी 40 वर्ष पूर्ण झालेल्या कॅनलचे दुष्काळ सदृश्य परिस्थितीत शेतकऱ्यांना पाणी मिळाला नाही असे लाभार्थी शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
याबाबत पिडीत शेतकऱ्याने वारंवार सहाय्यक अभियंता यांना भेटून याबाबतचे निवेदन दिले असता त्यांनी कुठलीच कारवाई केली नसल्याने सदर कॅनल पांढरा हत्ती ठरत असल्याने पाटबंधारे विभाग शेतकऱ्यांप्रती उदासीन आहे हे दिसून येते.
मुसळधार पावसाने शेतीचे नुकसान व कालव्याची दुरुस्ती करून शेतकऱ्यांना गरज पडेल तेव्हा पाणी मिळाले नाहीतर सदर कॅनल शेतकरी आपल्या शेतात मिसळेल्याशिवाय राहणार नाही असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. शेताची लवकरात नुकसान भरपाई व रब्बी शेती हंगाम सुरू होण्यापूर्वी कॅनलची योग्य दुरुस्ती करून दिली नाही तर संबंधित विभागाच्या विरोधात उपोषणाचे माध्यमातून आंदोलन छेडण्याचा गर्भित इशारा पीडित शेतकऱ्यांनी दिला आहे.
खुर्शीपार तलावमूळे हजारो हेक्टर शेत जमीन ओलित करण्याची क्षमता आहे त्या उद्देशाने पाच गावाच्या शेतजमीन पिकेल यासाठी कॅनल तयार करण्यात आले पण पाटबंधारे विभागाचे उदासीन धोरणामुळे गरजेचे वेळी शेतात पाणी पोहचत नाही अचानक आलेल्या मुसळधार पावसाने कॅनल फुटल्याने शेतीची नुकसान झाली व रोवणी वाहून गेल्याने पीडित शेतकऱ्यांना त्वरित आर्थिक मदत करावी व कॅनलची दुरुस्ती करावी.
कैलास (रणवीर)भगत कांग्रेस सेवादल जिल्हाध्यक्ष भंडारा