भंडारा पवनी विधानसभा मतदार संघातील शेतकरी , शेतमजूर,प्रकल्प ग्रस्त शेतकरी, कामगार, भूमीहीन, सुशिक्षित बेरोजगार, गोरगरीब,शोषित पिडीत मतदार बंधू भगिनींनो आपणा सर्वांच्या समस्या सोडवून भंडारा पवनी विधानसभा मतदार संघाचा विकास करण्यासाठी तुमचा पोरगा , भाऊ, मित्र असलेला मी नरेंद्र पहाडे हा सर्व सामान्य जनतेचा उमेदवार म्हणून निवडणूक लढवत आहे. या निवडणुकीत प्रचार रॅली सभे दरम्यान गावागावातील सर्व समाजाचे नेते ,पदाधिकारी व कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन डोअर टू डोअर प्रचार करीत असतांना सर्व मतदार बंधू भगिनीं कडून मला मोठ्या प्रमाणात समर्थन पाठिंबा मिळत आहे हे मी माझे भाग्य समजतो .
विरोधकांनी जनतेचे लोकप्रिय उमेदवार नरेंद्र पहाडे यांच्या जनशक्तीचा धसका घेतला असून ते या निवडणुकीत धनशक्तीचा वापर करून विकासाच्या नावाखाली साध्या भोळ्या मतदारांना विविध प्रकाराचे खोटे प्रलोभन देऊन मतदारांची मते विकत घेऊन मतांचे विभाजन करण्याचा कुटील डाव खेळण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे मतदार बंधू भगिनींनी याबाबत वेळीच सावध होणे काळाची गरज आहे.
भंडारा पवनी विधानसभा मतदार संघाच्या स्थानिक आमदार महोदयांना भंडारा पवनी विधानसभा मतदार संघाचा विकास करायचा होता तर सत्तेत असताना भंडारा पवनी तालुक्यात किमान एक तरी नवीन उद्योग स्थापन करून येथील स्थानिक सुशिक्षित बेरोजगार
युवक युवतींना प्रथम प्राधान्याने रोजगार उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न का करण्यात आला नाही?
सत्तेत असताना जनतेला आशेवर ठेवून फक्त जवळच्या मोजक्याच लोकांचा विकास करणे म्हणजे सर्वांगीण विकास होतो काय ? भंडारा पवनी तालुक्यातील गोसे प्रकल्प ग्रस्त शेतकऱ्यांचे प्रश्न अती प्रलंबित ठेवून त्यांचा विश्वासघात करण्याचे कारण काय ? भंडारा , पवनी शहर स्मार्ट सिटी न करण्याचे कारण काय? अड्याळला
नगरपंचायतचा दर्जा देण्यासाठी प्रयत्न न करण्याचे कारण काय ? प्रकल्प ग्रस्त नागरिकांचे पुनर्वसन व पुनर्स्थापनेचा प्रश्न रेंगाळत ठेवून त्यांना लॉलीपॉप देण्याचे कारण काय ? मुजबी ते भंडारा पर्यंतच्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा चे चौपदरीकरण करण्याकडे दुर्लक्ष करण्याचे कारण काय? धान उत्पादक शेतकरी बांधवांच्या धानाला खर्चावर आधारित हमी मिळावा यासाठी प्रयत्न न करण्याचे कारण काय ?
भंडारा पवनी विधानसभा मतदार संघाच्या स्थानिक आमदारांना फक्त निवडणुकीच्या तोंडावरच विकासाचा कोरडा पुळका येण्याचे कारण काय? विकासाचा कोरडा आव आणून विकासाची कोरडी भाषा करणारे स्थानिक आमदार या प्रश्नांची जाहीरपणे उत्तरे देतील काय?
आदी प्रश्न जनतेचे उमेदवार नरेंद्र पहाडे यांनी उपस्थित केले आहेत भंडारा पवनी विधानसभा मतदारसंघातील शेतकरी,प्रकल्प ग्रस्त शेतकरी, शेतमजूर, कामगार, भूमीहीन, सुशिक्षित बेरोजगार, गोरगरीब,शोषित पिडीत नागरिक हे माझ्या पाठीशी खंबीर पणे उभे असून सर्वसामान्य जनता हीच माझी शक्ती आहे या जनशक्तीने मला बळ प्राप्त झाले असून ही जनशक्तीच प्रचंड बहुमताने विजयी करेल याचा मला ठाम विश्वास आहे. मतदार बंधू भगिनींनो ही लढाई धनशक्ती विरुद्ध जनशक्ती ची लढाई आहे.
ज्यांनी स्वतःचाच विकास केला अशा खोकेबाजांच्या धनशक्तीच्या खोट्या प्रलोभनाला बळी न पडता सर्व सामान्य जनतेचे उमेदवार असलेल्या नरेंद्र पहाडे यास आपला पोरगा,भाऊ ,मित्र समजून माझ्या नावासमोरील तुतारी चिन्हाची बटण दाबून प्रचंड बहुमताने विजयी करावे आणि धनशक्ती विरुद्ध जनशक्तीची ताकद दाखवून खोकेबाजांना या निवडणुकीतून हद्दपार करून आमूलाग्र परिवर्तन करावे असे आवाहन नरेंद्र पहाडे यांनी केले आहे.