टीम सिटी टाइम्स लाखनी : प्रत्येक परिवारात छोट्या मोठ्या कारणाने भांडण होत असतात, नुकतेच लाखनी पोलीस ठाण्याचा हद्दीतील एका परिवारात अशीच शाब्दिक भांडणाची सुरुवात झाली मात्र हे भांडण इतक्या टोकाला गेले कि थेट पत्नीने पतीवर भाजीकापन्याच्या विळ्यानेच पतिवर हल्ला केला आहे.
दुर्गा मुन्ना टेकाम वय (28) रा. बरड किन्ही असे आरोपी पत्नीचे नाव आहे. हा प्रकार रविवारी (दि.20) रात्री आठ वाजताच्या सुमारास साकोली तालुक्यातील बरड किन्ही येथे घडला. याप्रकरणी मुन्ना बाबुराव टेकाम वय (32) रा. बरड किन्ही यांच्या तक्रारीवरून लाखनी पोलिसांनी पत्नीवर गुन्हा दाखल केला आहे.
पोलीस सूत्रानुसार, घटनेतील पत्नीने जेवनात चिकन बनवले नाही या,कारणावरून पतीने पत्नी सोबत शाब्दिक भांडणाची सुरुवात केली. दरम्यान, भांडण इतक्या टोकाला गेले कि, पत्नीने घरातील भाजी कापण्याच्या विळा हातात घेऊन त्याच्या मागील लोखंडी बाजूने पतीवर हल्ला केला. यात मुन्ना टेकाम याच्या डोक्याला दुखापत होऊन रक्तबंबाळ झाला. या घटनेची माहिती मुन्नाने लाखनी पोलिसांना दिली.
याप्रकरणी, ग्रामीण रुग्णालय लाखनी यांच्या वैद्यकीय अहवालवरून तसेच मुन्ना याच्या फिर्यादीवरून लाखनी पोलिसांनी पोलीस निरीक्षक हृदयनारायण यादव यांच्या आदेशानव्ये आरोपी पत्नीवर कलम 118,(1) भारतीय न्याय संहिता अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा पुढील तपास पोलीस हवालदार निलेश रामटेके हे करीत आहेत.