टीम सिटी टाइम्स लाखनी | गणेशोत्सवासह ईद-ए-मिलाद उत्सव येणार आहे. शांतता व सुव्यवस्था अबाधित ठेवून सन आणि उत्सव साजरे करावे. तसेच शासनाच्या मार्गदर्शक सूचना नुसार मिरवणूक व विसर्जनाची परवानगी घ्यावी.
हलक्या प्रतीच्या गर्भार धानास पावसामुळे संजीवनी
या करिता मंगळवारी(ता.५) दुपारी ३:०० वाजता मेमन हॉल येथे गणेश मंडळातील पदाधिकारी व सदस्य, डीजे डॉल्बी व डेकोरेशन चालक मालक तसेच पोलिस पाटील यांचे संयुक्त बैठकीला मार्गदर्शन करतांना पोलिस निरीक्षक मिलिंद तायडे यांनी सांगितले. तसेच एक खिडकी योजनेसंबंधात माहिती दिली.
लाखनी पोलिस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या सर्व गावातील गणेश मंडळाचे पदाधिकारी व सदस्य, डीजे डॉल्बी डेकोरेशन चालक मालक, शांतता समिती सदस्य, ईद च्या संबंधाने प्रतिनिधी तथा पोलिस पाटील यांची मंगळवारी मेमन हॉल लाखनी येथे संयुक्त बैठक आयोजित करण्यात आली होती.
हेही वाचा | ISRO : चांद्रयानवर सुरू केली प्रश्नमंजूषा – विजेत्याला मिळणार एक लाख रुपयांचे बक्षीस
त्यात पोलिस निरीक्षक मिलिंद तायडे यांनी गणेशोत्सव व ईद या संबंधाने विविध प्रकारच्या मार्गदर्शक सूचना तथा गणेशोत्सवासाठी वेळेवर विसर्जन करण्यासंबंधाने सूचना देण्यात आल्या, डिजे मालकांना आवाजाची मर्यादा व वेळेचे बंधन तसेच रुट व मिरवणूक या बाबद आवश्यक त्या सूचना दिल्या.
विसर्जन स्थळावर घ्यावयाच्या दक्षतेबाबद सूचनांचे काटकोरपणे पालन करावे, पिओपी च्या मुर्त्या वापरू नये, रात्रीला गणपती मंडळामध्ये सुरक्षेच्या दृष्टीने २ किंवा जास्त व्यक्ती नेमावे, वेळेच्या आत व दिलेल्या तारखेलाच गणपती विसर्जन करण्याच्या सूचना देण्यात आल्या. तसेच एक खिडकी योजनेअंतर्गत घ्यावयाच्या परवानगी बाबदचे सखोल मार्गदर्शन करण्यात आले.
हेही वाचा | शिक्षकदिनी शिक्षक संघटना आंदोलनाच्या पावित्र्यात
तसेच गणेशोत्सव शांततेत कशे पार पाडता येईल. या बाबदही पोलिस निरीक्षक मिलिंद तायडे यांनी मोलाचे मार्गदर्शन केले. यावेळी पोलिस हवालदार सुरेश आत्राम, पोलिस अमलदार पियूष बाच्छिल, क्रांतीश कराडे प्रामुख्याने उपस्थित होते.