सिटी टाइम्स ऑनलाईन भंडारा | भंडारा जिल्ह्यात गेल्या चार-पाच दिवसांपासून पावसाचे थैमान सुरू आहे. भंडारा , पवनी व लाखांदुर तालुक्यामध्ये मोठया प्रमाणात पाऊस पडलेला आहे.
हेही वाचा | शाळेतील चार विदयार्थीनींवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या शिक्षकाला अटक
या अतीवृष्टीमुळे भंडारा तालुक्यातील मोहदुरा येथील राष्ट्रमाता इंदीरा गांधी हायस्कूल व कनिष्ठ महाविदयालयाची सुरक्षा भिंत कोसळली आहे. यांमुळे शाळेचे ४० हजारांचे नुकसान झालेले आहे. सदर भिंत ही तीन दिवसांपूर्वी आलेल्या मुसळधार पावसामुळे कोसळलेली आहे.
हेही वाचा | लाखनी पोलीस विभागातर्फे आयोजित आदर्श गाव मिशन व विदयार्थी मार्गदर्शन मेळावा संपन्न
घटनेची माहीती मिळताच पंचायत समीती सदस्य विलास लिचडे यांनी प्रत्यक्ष शाळेला भेट देवून नुकसानीची पाहणी केली. यावेळी शाळेचे निमंत्रक सेवानिवृत्त प्रा. अशोक लांडगे , कनिष्ठ महाविदयालयाचे प्रभारी प्रा. मेघश्याम झंझाड , प्रा. जगन माकडे व सामाजिक कार्यकर्ते कृष्णाजी भोंदे तसेच अन्य शिक्षकगण उपस्थित होते.
हेही वाचा | AISF च्या वतीने भंडारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महाधरणे आंदोलन