सिटी टाइम्स ऑनलाईन वर्धा | वर्धा जिल्ह्यातील नितेश कराडे हे संपूर्ण महाराष्ट्रात ” खदखद फेम कराडे मास्तर ” म्हणून प्रसिद्ध आहेत. वर्धा येथील फिनीक्स करीअर डेवलपमेंट ॲकेडमी या स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राचे ते संचालक आहेत.
हेही वाचा | आदिवासी आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना जेवणातून विषबाधा
आपल्या खास वैदर्भीय वऱ्हाडी भाषेतून त्यांनी भाषा व शिक्षणाचा सुरेख मेळ घडवून आणला आहे. कोरोना काळातील ऑनलाइन मायबोली वऱ्हाडी भाषेतील शिकवणीमुळे ते चांगलेच प्रसिद्ध आहेत.
हेही वाचा | Google भारताच्या यशाचा आनंद साजरा करत आहे
कराडे मास्तरांच्या बाणेदार , स्पष्ट व आव्हानात्मक भाषणशैलीमुळे अनेक राजकीय , सामाजिक व धार्मिक कार्यक्रमात त्यांना पाचारण केले जाते.
प्राप्त माहीतीनुसार वर्ध्यातील ग्राम सुकळी (बाई ) या गावी हनुमान मंदीराच्या महाप्रसाद कार्यक्रमात त्यांना बोलविण्यात आले होते. सदर कार्यक्रमात कराडे मास्तरने आपल्या भाषणातून धार्मिक भावना दुखावल्याची बतावणी करून एका संघटनेच्या पदाधिकाऱ्याने त्यांच्या कानशिलात लगावली.
ही बातमी दै. नमस्कार वर्धा या दैनिकात छापण्यात आली होती. परंतु सदर बातमी ही धादांत खोटी असल्याचे वक्तव्य नितेश कराळे यांनी सोशल मिडीयातील आपल्या फेसबुक पेजवरून केले आहे. आपल्या चाहत्यांमध्ये संभ्रम होता कामा नये म्हणून त्यांनी आपल्या फेसबुक पेजवर जावून सत्यकथन केले आहे.
अलीकडे कराडे मास्तरांच्या प्रसिद्धीमुळे तसेच त्यांच्या स्पष्ट व सत्य बोलण्यामुळे अनेकांच्या पोटात दुखू लागले आहे. त्यामुळे मला बदनाम करण्याचा हा कट आहे. तसेच महाप्रसादाच्या कार्यक्रमात कुणीही माझ्या अंगावर चालून आला नाही. फक्त शाब्दिक चकमक झाली. अशा शब्दांत कराडे मास्तर यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
हेही वाचा | सांस्कृतिक महोत्सव ग्रामीण प्रतिमेला शहरात घेऊन जाणारा – खा. सुनील मेंढे