टीम सिटी टाइम्स लाखनी | विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता व सर्वांगीण विकासासाठी शासन स्तरावर जे उपक्रम राबविले जातात त्याची माहिती शिक्षकांपर्यंत पोहोचविण्याचे साधन म्हणजे शिक्षण परिषद असून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासात शिक्षकाची भूमिका महत्त्वाची असल्याचे प्रतिपादन शिक्षण विस्तार अधिकारी सुधाकर झोडे यांनी जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा पालांदूर येथे आयोजित पहिल्या केंद्रस्तरीय शिक्षण परिषदेत केले.
शिक्षण परिषदेचे आयोजन जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था भंडारा व शिक्षण विभाग जिल्हा परिषद भंडारा, गटसाधन केंद्र लाखनी व केंद्र पालांदूर यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते.केंद्रस्तरीय शिक्षण परिषदेत मनोज हलमारे साधन व्यक्ती गटसाधन केंद्र लाखनी यांनी विद्यार्थी गुणवत्ता विकास महाअभियान, अरविंद तिरपुडे
मुख्याध्यापक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वाकल यांनी मुख्यमंत्री माझी शाळा,सुंदर शाळा स्पर्धा,सुनंदा मांदाडे सहाय्यक शिक्षिका जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मऱ्हेगाव यांनी आनंददायी शनिवार व दप्तरमुक्त दहा दिवस शाळा उपक्रम, तर पुनम मोरे सह.शिक्षिका जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खराशी यांनी विद्या प्रवेश अंमलबजावणी याविषयी मार्गदर्शन केले.
केंद्रप्रमुख रसेसकुमार फटे यांनी शोधनिबंध, तंबाखूमुक्त शाळा अभियान,विद्यार्थी व शिक्षकांसाठी वाचनाचे महत्त्व, पाठ्यपुस्तकातील कोऱ्या पानांचा उपयोग,शाहू महाराज निबंध स्पर्धा,विज्ञान नाट्य मेळावा, इन्स्पायर अवार्ड, विनोबा ॲप विषयी माहिती दिली.
सदर शिक्षण परिषदेला केंद्रातील सर्व व्यवस्थापनाचे वर्ग एक ते आठ चे सर्व शिक्षक व मुख्याध्यापक हजर होते.शिक्षण परिषदेच्या यशस्वीतेसाठी सविता खंडाईत केंद्र मुख्याध्यापक,सुनंदा टेंभुर्णी उच्चश्रेणी मुख्या.,पौर्णिमा रामटेके उच्च श्रेणी मुख्या.व सर्व शिक्षकांचे सहकार्य लाभले. संचालन महेंद्र राऊत सहाय्यक शिक्षक यांनी तर आभार सतीश वासनिक पदवीधर शिक्षक यांनी मानले.