टीम सिटी टाइम्स भंडारा | महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाव्दारे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाच्या इयत्ता १० वी व १२ वी च्या परिक्षेत सर्वसामान्य विद्यार्थ्यांमधुन विभाग, जिल्हा, तालुका , शाळा , कनिष्ठ महाविद्यालयातुन प्रथम येणाऱ्या अनुसूचित जाती प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांना ” छत्रपती
शाहू महाराज गुणवत्ता पुरस्कार” सन २००३-०४ या शैक्षणिक वर्षापासून देण्यास शासनाने मान्यता दिली आहे असे सामजिक कार्यकर्ता विजया ठाकरे नंदूरकर यांनी सांगितले.
भंडारा जिल्ह्यातील शाळा व कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्य यांनी त्यांची शाळा, कनिष्ठ महाविद्यालयातुन शैक्षणिक सत्र २०२३-२४ , फेब्रुवारी व मार्च २०२४ मध्ये इयत्ता १० वी व १२ वी च्या परिक्षेत प्रथम आलेल्या अनु. जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांचे प्रस्ताव सहायक आयुक्त समाज कल्याण कार्यालय भंडारा येथे पाठवावे तसेच
विभागातून प्रथम ५० हजार , जिल्ह्यातून प्रथम २५ हजार , तालुक्यातून प्रथम १० हजार व शाळा अथवा कनिष्ठ महाविद्यालयातून प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यास ५ हजार रुपये पारितोषिक देण्यात येणार असल्याचे सामजिक कार्यकर्त्या विजया ठाकरे नंदूरकर यांनी सांगितले.