टीम सिटी टाइम्स लाखनी | भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी अहमदनगर येथे कार्यकर्ता बैठकीत लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाची मानहानी होईल. असे आक्षेपार्ह विधान करून समाजात बदनामी केल्याने जाहीर माफी मागावी अन्यत: पत्रकार संरक्षण कायद्यान्वये कारवाई करावी.
याकरिता सिटी टाइम्स लाखनी चे वतीने तहसीलदार दत्तात्रय निंबाळकर यांचे मार्फत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन पाठविण्यात आले आहे. त्यांचेकडून काय कारवाई केली जाते. याकडे पत्रकारांचे लक्ष लागले आहे.
संसदीय लोकशाही प्रणालीत लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाला अनन्य साधारण महत्व आहे. पण राजकारण्यांना सत्तेची नशा चढली की प्रसिद्धीसाठी बेताल वक्तव्य करण्याची स्पर्धा लागल्याचे दिसते. असे निवेदनात नमूद आहे.
पत्रकरांबाबद केले होते आक्षेपार्ह विधान
भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी २४ सप्टेंबर रोजी अहमदनगर सावेडी येथील माऊली सभागृहात महाविजय २०२४ विधानसभा पदाधिकारी संवाद बैठकी दरम्यान “बूथ रचना आणि पदाधिकाऱ्यांनी सांभाळावयाच्या जबाबदाऱ्या” या विषयावर मार्गदर्शन करतांना लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाबाबद त्यांची जीभ घसरून चुकीचे वक्तव्य केल्याने स्वाभिमानी पत्रकारांच्या प्रतिमेस तडा जाऊन प्रतिमा मलिन झाली आहे.
प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पत्रकारांची जाहीर माफी मागावी. अन्यत: त्यांचेवर पत्रकार संरक्षण कायद्यान्वये कारवाई करण्यात यावी. याकरिता सिटी टाइम्स लाखनीच्या वतीने तहसीलदार लाखनी मार्फत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन पाठविण्यात आले आहे. यावेळी कालिदास खोब्रागडे, आशिक नागदेवे, धनंजय लोहबरे, सचिन रामटेके, अतुल नागदेवे, खुशाल भुरे, अतुल कांबळे, शुभम सूर्यवंशी, नेहाल कांबळे, अश्विनी भिवगडे यांच्या निवेदनावर स्वाक्षऱ्या आहेत.