आजघडीला भारत देशात अनेक साधु-महात्मे व बुवाबाजींचे प्रस्थ वाढतांनी दिसत आहेत. हजारो भक्तगण या बुवाबाबांच्या व महाराजांच्या सत्संगाला हजर असतात. कमी शिकलेले व निर्बुद्धी लोक या तथाकथित महाराजांच्या नादी लागतात. अलीकडे तर सुशिक्षित व शिकलीसवरलेली मंडळीही यांच्यासमोर लोटांगण घालताना दिसत आहे. मानवी जीवन हे दुर्लभ आहे.
हेही वाचा | २०२२-२३ पासून प्रधानमंत्री आवास योजनेचे उद्दिष्ट नाही
निव्वळ पोट भरण्यासाठी व मौजमजा करण्यासाठीच हे जीवन नसते तर विवेकबुद्धी वापरून सत्याची पारख करून बहुजन हितासाठी जीवन जगायचं असते. तथाकथित पोंगापंडीत बाबा व महाराज बहुजनांना खोटया व काल्पनिक कथा सांगून त्यांची डोकी नासविण्याचे काम करतात. हे कार्य अविरत चालू आहे. बहुजनांच्या अज्ञानावर यांचे पोट भरत असते.
एकदा अशा पाखंडी व बहुचर्चित असलेल्या महाराजांच्या महाराजांच्या सत्संगातील एक वाक्य कानी पडले. महाराज म्हणतो की , ज्याला संतान होत नाही त्याने गाईचे शेण खावे तरच त्याला मुलाबाळाचे सुख प्राप्त होईल.
एवढयावरच तो थांबला नाही तर त्याने कशा प्रकारे व कोणते शेण खायचे यावर स्पष्टीकरण दिलेले आहे. अडाणी भक्तगण महाराजांच्या सांगण्यावरून मोठया श्रद्धाभावाने हा प्रयोग करतो. केवढी शोकांतीका समजावी या विज्ञानयुगात असं घडतयं ते.
शेवटी जैसी मती वैसी गती. हजारो वर्षापासून बहुसंख्य समाज या धर्माच्या अंधकारात गुदमरत आहे. आपली बुद्धी गहाण ठेवून जगत आहे. मग भारत विश्वगुरू कसे बनणार हा मोठा प्रश्नच निर्माण झाला आहे.
हेही वाचा | भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या जनसंवाद यात्रेला प्रचंड प्रतिसाद
ज्या महामानवांनी या देशाला गुलामगीरीतून मुक्त करण्यासाठी जीवाचे रान केले तो त्याग या मुर्ख व अज्ञानी लोकांना अजूनपर्यंत कळलेला नाही. इथे धर्माच्या नावाखाली भावा-भावामध्ये झगडे लावल्या जात आहेत. मी हिंदू , मी मुसलमान , मी ख्रिश्चन अशी भावना वाढीस लागलेली आहे. देव व दानवाची निर्मिती या मानवानेच केलेली आहे. आपले खरे अस्तित्व विसरून मानवप्राणी मृगजळाच्या मागे धावत आहे.
खरतंर विवेकबुद्धीने विचार केला तर माणूस हा अग्नी , पाणी , हवा व माती या चार घटकांपासून बनलेला आहे. निसर्गनियमांनुसार ही सृष्टी चालत असते. सगळं काही नैसर्गिक पद्धतीने घडत असते. परंतु धर्मभोळा समाज हा अविवेकी पद्धतीने आपल्याच पायावर जखम करीत आहे.
भारत देशाला विश्वशक्ती बनयचं असेल तर विदयार्थ्यांनी विज्ञाननिष्ठ झाले पाहीजे. खरं- खोटं ओळखण्याची शक्ती निर्माण झालीच पाहिजे. तर्कशुद्ध पद्धतीने घडणाऱ्या घटनांचा शोध घेतला तरच भारत देश विकासाच्या शिखरावर जाणार आहे.
हेही वाचा | परवानाधारक फुटकळ देशी दारू विक्रेत्यांकडून तळीरामांची लूट
विदयार्थीवर्गाने विज्ञानाची कास धरली तरच समाजात आमुलाग्र बदल घडून येतो. बहुतांशी समाज हा जाती-जातीमध्ये विखुरलेला आहे. जातीश्रेष्ठत्वाची भावना ही देशविकासाला बाधीत करते. भारत महासत्ता बनण्यासाठी राष्ट्रप्रेम जागृत होणे गरजेचे आहे. धर्म हा मानवाचे तारण करणार ही चुकीची भावना आहे. निसर्गनियमांना अनुसरून केलेली योग्य कृतीच समाजाचे व राष्ट्राचे तारण करू शकते.
कपोलकल्पीत कथांना व घटनांवरती विश्वास ठेवू नये. सत्याची कास धरावी. मैत्रीभावना जोपासली तर हिंसा होणार नाही. भारतीय संवीधान हेच मानवकल्याणाचे प्रमुख शस्त्र आहे. जे अहिंसक स्वरूपाचे आहे. विदयार्थी हा देशविकासाचा प्रमुख कणा आहे.
विदयार्थ्यांमध्ये सद्विचार पेरणी केली तरच तो सद्वर्तन करून सत्यशोधक समाजाची निर्मिती करू शकतो. छत्रपती शिवाजी महाराज महात्मा फुले , शाहू महाराज व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांतील विदयार्थी घडवीणे ही काळाची गरज आहे. अंधभक्ती सोडा व विज्ञानवादाला स्विकारा हेच आजघडीला सांगणे आहे.