सिटी टाइम्स ऑनलाईन नागपूर | सध्याचे युग हे आधुनिक तंत्रज्ञानाचे युग आहे. इंटरनेटच्या माध्यमातून संपूर्ण जग जवळ आले आहे. आधुनिक तंत्रज्ञान विकसीत झाल्यामुळे बाजारपेठांचे स्वरूपही अदययावत झालेले आहे.
आधुनिक मोबाईल क्रांती होण्यापूर्वी परंपरागत पद्धतीने खरेदी-विक्रीचा व्यवसाय चालत असे. यामध्ये ग्राहक – किरकोळ दुकानदार – एजंसी धारक – ग्राहक अशाप्रकारे वस्तूविनीमयासंदर्भातील साखळी निर्माण झाली होती. प्रत्येकाला त्याचा योग्य तो नफा ठेवून ग्राहकापर्यंत गरजेची वस्तू पोहचत असे.
नाना पटोले यांचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष पद टिकनार का ? राजकीय वर्तुळात ऊलट-सुलट चर्चेला ऊत…
परंतु बदलत्या काळानुसार या पारंपारिक खरेदी- विक्री प्रकारामध्ये शिथीलता आली आहे व त्याचा फटका सामान्य दुकानदारांना बसला आहे. मोबाईल क्रांतीमुळे ऑनलाईन पद्धतीने खरेदी-विक्रीचा व्यवसाय सुरू झालेला आहे.
याचा विशेष फायदा ग्राहकवर्गाला होताना दिसून येत आहे. इच्छित वस्तू दर्जेदार व किफायतशीर दरात मिळत असल्यामुळे शहरी व ग्रामीण भागातील ग्राहकांचा कल मोठया प्रमाणात ऑनलाईन खरेदी करण्याकडे झालेला आहे.
” भांडवलदार तुपाशी अन् किरकोळ व्यापारी उपाशी “
आजच्या घडीला पायापासून ते डोक्याचा केसापर्यंत प्रत्येक गरजेची वस्तू या ऑनलाईन बाजारात मिळत असते. ॲमेझान , प्लिपकार्ट , मीशो इ. अनेक कंपन्यांनी ऑनलाईन पद्धतीने व्यवसाय करून करोडो-अब्जो रूपयांचे भांडवल उभे केले आहे.
एकीकडे या माध्यमातून बेरोजगारी काहीशा प्रमाणात दुर झाली असली तरी दुसरीकडे लहान-मोठे दुकानदार व व्यापारीवर्ग या प्रकारामुळे उदासीन आहे. किरकोळ व्यावासायिकांना ग्राहक मिळणे कठीण झाले आहे. या अॉनलाईन व्यवसायात रोजच करोडोंची उलाढाल होताना दिसून येत आहे.
खरेदी-विक्रीचा किरकोळ व घाऊक व्यापाऱ्यांना चांगलाच फटका बसला आहे. या ऑनलाईन पद्धतीमुळे भांडवलशाहीला बळकटी मिळत आहे. सामान्य जनतेचा पैसा वर्गीकृत होण्याऐवजी एका विशिष्ट समुहाकडे जात आहे. याला वेळीच आवर घातला नाहीतर किरकोळ विक्रेते आपल्या न्यायहक्कासाठी रस्त्यावर येतील अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.
हेही वाचा | राष्ट्रवादी काँग्रेस मधील फुट महाराष्ट्रातील जनतेला खरंच तारणार ?
हेही वाचा | 30 कोटी 90 लाखांच्या सौंदर्यीकरण मंजूरी! खा. सुनील मेंढे यांच्या प्रयत्नाला यश