टीम सिटी टाइम्स लाखनी | लाखनी ठाण्याच्या हद्दीतील एका गावातील 17 वर्षीय अल्पवयीन मुलाने नात्यातील 13 वर्षीय अल्पवयीन मुलीला गर्भवती केल्याची धक्कादायक घटना दि. 1 सप्टेंबर रोजी उघकडीस आली आहे. या घटनेतील आरोपी नात्यातीलच असून, आरोपीने 13 वर्षीय मुलीवर अत्याचार केल्याचे वैद्यकीय तपासणीत उघड झाल्याने या घटनेचे बिंग फुटले.
या घटनेतील अल्पवयीन पिडीत मुलगी व विधिसंघर्षीत आरोपी हे एकाच गावचे असुन नात्यातीलच आहेत. पिडीत मुलीला मागील काही महिन्यांपासून मासिक पाळी येत नसल्याने दि.२९ऑगस्ट रोजी पीडितेच्या आईने लाखनी येथील रुग्णालयात नेले.
दरम्यान, कर्तव्यावरील डॉक्टरांनी तपासून मुलगी मागील तीन महिन्याची गर्भवती असल्याचे सांगितले.हे ऐकून पीडितेच्या आईला धक्काच बसला. आईने मुलीची कसून विचारपूस केली असता, माहे एप्रिल व मे २०२४ मध्ये आरोपीने पिडीत मुलीसोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याची कबुली दिली.सध्या पिडीत मुलीचा गर्भपात करण्याकरिता सामान्य रुग्णालय भंडारा येथील आंतररुग्ण विभागात दाखल करण्यात आले आहे.
डॉक्टरांचा वैद्यकीय अहवाल तथा पिडीत मुलीच्या आईच्या तक्रारीवरुन लाखनी पोलिस ठाण्यात आरोपीविरुद्ध कलम ३७६ (२) भांदवी, बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम २०१२, सहकलम ४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक सुनिल सोनवाणे करीत आहेत.