टीम सिटी टाइम्स भंडारा | ठाणे जिल्यातील बदलापूरच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर साकोली येथील मागासवर्गीय मुलींच्या शासकीय वसतिगृहात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भंडारा- गोंदिया जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना दि.२२ऑगस्ट रोजी सकाळी साडेनऊ वाजताच्या सुमारास आकस्मिक भेट दिली.
या भेटी दरम्यान, वसतिगृहातील गृहपाल शहारे मॅडम,मदतनीस कोराम, स्वयंपाकी छगन समरीत, बाह्यस्रोत कर्मचारी भाग्यश्री लांजेवार, माधुरी ढोवळे, कीर्ती कुंभरे, संजना तिरपूडे, सुरक्षारक्षक करिष्मा खोब्रागडे तसेच बहुसंख्येने विद्यार्थिनी उपस्थित होते.
मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी वसतिगृहाची शहानिशा करतांना सुरक्षेविषयी विचारना केली. वसतिगृहात सिसिटीव्ही कॅमेरे लावले आहेत का? यासोबतच विविध मुद्यावर त्यांनी विद्यार्थिनी व वसतिगृह प्रशासनाशी चर्चा केली. विद्यार्थिनींसोबत चर्चा करतांना राज ठाकरे म्हणाले कि, वस्तीगृहात सर्व सुविधा उपलब्ध आहेत काय? जेवण कसे मिळते?तुम्हाला काही त्रासदायक गोष्टी आहेत का?
अशा अनेक विषयावंर संवाद केला.एकंदरीत राज्याची परिस्थीती खूपच वाईट असून,मुलींनी स्वतःची काळजी घेणे,सतर्क राहणे गरजेचे आहे. तसेच विनाकारण वसतिगृहाच्या बाहेर पडू नये.सहा वाजताच्या आत वस्तीगृहात हजर व्हावे.असा सल्ला यावेळी राज ठाकरे यांनी दिला.सदर भेटी दरम्यान, साकोली येथील ठाणेदार संजय गायकवाड हजर होते.