टीम सिटी टाइम्स लाखनी | महाराष्ट्र राज्य साहित्य सांस्कृतिक मंडळ मुंबई, अनुभव साहित्य व शैक्षणिक प्रतिष्ठान, समर्थ महाविद्यालय लाखनी आणि विदर्भ साहित्य संघ यांच्या संयुक्त विद्यमाने मराठी भाषा संवर्धन पंधरवाडा निमित्त समर्थ महाविद्यालय लाखनी येथे जिल्हा स्तरीय काव्य वाचन स्पर्धा ३१ जानेवारीला भगिनी निवेदिता सभागृह येथे आयोजित करण्यात आली होती.
या स्पर्धेला अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ दिगांबर कापसे, प्रमुख पाहुणे म्हणून डॉ भारत भूषण शास्त्री, डॉ बळवंत भोयर, डॉ बंडू चौधरी, डॉ नीलिमा कापसे, डॉ मुक्ता आगाशे, प्रा अजिंक्य भांडारकर प्रामुख्याने उपस्थित होते. जिल्हास्तरीय काव्यवाचन स्पर्धेला जिल्ह्यातील विविध महाविद्यालयातील एकूण ६० विद्यार्थ्यांनी उपस्थिती दर्शवली होती.
यात वरिष्ठ विभागातून प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांक अनुक्रमे देण्यात आले, यात जानवी अतकरी, समर्थ महाविद्यालय लाखनी, मंजुषा गायधनी, विदर्भ महाविद्यालय लाखनी, चंद्रहास खंडारे, समर्थ महाविद्यालय लाखनी आणि प्रोत्साहनपर श्रेया काटगाये,
समर्थ महाविद्यालय, लाखनी या विद्यार्थ्यांना दि २० फेब्रुवारी रोजी आद्य कवयित्री महादंबा साहित्य संमेलन सुरेश भट, सभागृह नागपूर येथे रामटेक लोकसभा क्षेत्राचे खासदार कृपाल तुमाने, महादंबा साहित्य संमेलनाचे अध्यक्ष बाबुळगावकर बाबा शास्त्री आणि अखिल भारतीय
मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ रवींद्र शोभणे यांच्या हस्ते सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. या वेळी समर्थ महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ दिगांबर कापसे, विदर्भ महाविद्यालय मराठी विभाग प्रमुख डॉ नीलिमा कापसे, डॉ बंडू चौधरी, प्रा अजिंक्य भांडारकर यांच्याही सत्कार करण्यात आला.