टीम सिटी टाइम्स लाखनी | विदर्भ शाहीर कलाकार परिषद कन्हाण, शाखा-भंडारा तथा स्वर्गीय सुलोचना पारधीकर बहुद्देशीय संस्था मासलमेटा तालुका लाखनी यांच्या संयुक्त विद्यमाने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती व स्वर्गीय धर्मदास भिवगडे यांचे पुण्यतिथी निमित्त दि. २८ व २९ ऑगस्ट २०२४ रोज बुधवार व गुरुवारला संताजी मंगल कार्यालय लाखोरी रोड, लाखनी येथे विदर्भस्तरीय सांस्कृतिक कला महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.
या विदर्भस्तरीय सांस्कृतिक कला महोत्सवात विदर्भातील नाटक, तमाशा, नौटंकी, गोंधळ, भारुड, कला पथक, दंडार, कीर्तन, भजन, डहाका, गायन, वादन, नृत्य, शाहिरी, नक्कल, पोवाडा, जात्यावरचे गाणे, रोवणीचे गाणे, विविध सांस्कृतिक क्षेत्रातील पुरुष, महिला, बाल कलाकारांचा द्वी दिवसीय भव्य मेळावा पार पडला. या कार्यक्रमात भाजपा जिल्हाध्यक्ष प्रकाश बाळबुध्दे यांनी कलाकारांच्या विविध मुद्द्यावर सकारात्मक भाष्य केले.
तसेच कला व संस्कृती जिवंत ठेवण्याचे काम कलावंत करीत असतात.त्यामुळे त्यांचे अभिनंदन सुद्धा केले.दि.१४ ऑगस्ट रोजी भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री यांना प्रत्यक्षात भेटून शासकीय मानधन समितीचे गठन करून कलाकारांच्या रास्त मागण्या उदा. त्यांचे वय ५० वरुन ४५ करण्यात यावे. एसटी मध्ये सवलत मिळावी, जीवन सुरक्षा कवच तसेच ई. मागण्याकरीता शासन दरबारी मार्गी लागण्याकरीता भाजप जिल्हाध्यक्ष प्रकाश बाळबुध्दे यांनी आश्वासित केले.
यावेळी मंचावर माजी आमदार बाळा काशिवार, युवा भाजपा नेते डॉ. सोमदत्त करंजेकर, उपसभापती गिरीश बावनकुळे, रेखा भाजीपाले, भाजपा तालुकाध्यक्ष श्रावण कापगते, केंद्रीय अध्यक्ष मनिष भिवगडे, अलंकार टेंभुरणे, माजी उपसभापती वसंता कुंभरे, जिल्हाध्यक्ष डॉ. रामनाथ पारधिकर,गोंदिया जिल्हाध्यक्ष चुळामन लांजेवार मानधन समिती सदस्य ज्योती वाघाये, लाखनी तालुकाध्यक्ष केशव फसाटे व ईतर अनेक मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाला मोठया संख्येने कलाकार बांधव उपस्थित होते.