टीम सिटी टाइम्स भंडारा | राज्यात लोकसभा निवडणुकीचे वातावरण चांगलेच तापले आहे. महायुती व महाविकास आघाडीने विजयासाठी आपले उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे केले आहेत. सन २०२४ ही लोकसभा निवडणूक ही रंगतदार होईल यात शंका नाही.
राज्यात महाविकास आघाडीत वंचितच्या सहभागाचा तिढा न सुटल्यामुळे वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा ॲड.प्रकाश आंबेडकर यांनी स्वतंत्रपणे निवडणूक लढविण्याचा निर्धार केला आहे.सदयस्थितीत राज्यात वंचितची स्थिती मजबूत आहे. निवडणुकीअ अगोदर प्रकाश आंबेडकर यांनी शेकडो ठिकाणी सभा गाजविलेल्या आहेत.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वंचितचे भंडारा-गोंदीया लोकसभा उमेदवार संजय केवट यांच्या प्रचारार्थ ॲड. प्रकाश आंबेडकर यांची सत्ता परीवर्तन महासभा दि. १२ एप्रिल २०२४ रोजी सायंकाळी ६ वाजता हल्दीराम हाटेल जवळील विवाह लान च्या भव्य प्रांगणात आयोजित करण्यात आली आहे.
वंचित-शोषित समाजाचा उमेदवार उभा करून वंचितांच्या न्याय हक्काची लढाई ॲड. बाळासाहेब आंबेडकर लढत आहेत. तेव्हा वंचित बहुजन आघाडी च्या सभेला बहुसंख्य जनतेने हजर रहावे असे आवाहन वंचित बहुजन आघाडी , भंडारा जिल्हा अध्यक्ष धनपाल गटपायले तथा कार्यकारीणीच्या वतीने करण्यात आले आहे.