टीम सिटी टाइम्स भंडारा | महाराष्ट्र काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले हे प्रचार दौऱ्यावर असताना त्यांच्या कारला अपघात झाला. परंतु यात कोणतीही जिवीतहानी झाली नाही असे विश्वसनीय सूत्रांकडून माहीती मिळाली.
भंडारा तालुक्यातील गणेशपूर येथील प्रचारसभा आटोपल्यानंतर नाना पटोले हे साकोली तालुक्यातील आपल्या स्वगृही सुकळी गावाकडे खाजगी ताप्यासह एम.एच ३१ एक्स झेड ७९७ या आपल्या वाहनाने निघाले. त्या दरम्यान भंडारा येथून ७ कि.मी अंतरावर असलेल्या भिलेवाडा येथे मागेहून येणाऱ्या चारचाकी वाहन सी.जी ०४ एन.टी ८७३९ क्रमांकाच्या ट्रकने त्यांच्या वाहनाला मागेहून जोरदार धडक दिली. यामध्ये गाडीचे खूप नुकसान झाले. परंतु कोणतीही जीवितहानी झाली नाही.
या घटनेमुळे काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे यांनी भाजपवर निशाना साधला असून, ते म्हणाले की , विरोधी पक्षांच्या नेत्यांना संपवून भाजपाला निवडणूक जिंकायची आहे काय ? असा सवाल उपस्थित केला.
या अपघातानंतर वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड.प्रकाश आंबेडकर यांनी या अपघाताबाबत गंभीर होवून अपघाताची चौकशी व्हावी अशी मागणी केली आहे. त्यांनी नानाभाऊंच्या आरोग्याविषयी मंगलकामना करीत महाराष्ट्र पोलिसांनी नेत्यांना अधिक संरक्षण देण्याचीही मागणी केली आहे.