अतुल नागदेवे लाखनी | तालुक्यातील ग्राम सामेवाडा येथील रवींद्र मेश्राम, चेतना मेश्राम या दाम्पत्यांचे दोन मुले असून मोठ्या मुलाचे नाव चेतन व लहान मुलाचे नाव स्वानंद अशी आहेत.दोन्ही मुलांचा प्रवेश सन २०१८-१९ या शैक्षणिक वर्षात शहरालगत मानेगाव येथील एआयएम पब्लिक स्कुल या खासगी शाळेत केला होता.
चेतन हा चौथ्या वर्गात शिकत होता. तर, स्वानंद पहिल्या वर्गात शिकत होता. मात्र कोरोनाच्या काळात पालकांच्या व्यवसायात बाधा निर्माण झाल्यामुळे आर्थिक संकट आले.
मुलांचे शैक्षणिक शुल्क भरण्यासाठी अडचण निर्माण झाली. त्यामुळे पालकांनी फी भरली नाही.परिस्थिती हलाकीची असल्याने पुढील शिक्षणासाठी एआयएम पब्लिक स्कुल मधून टी.सी काढण्याचा निर्णय घेतला.परंतु शाळेतील मुख्यध्यापिका यांनी आधी फी जमा करा तरच टीसी मिळेल असा तगादा लावला. दरम्यान फी आम्ही देऊ शकलो नाही अशी माहिती मेश्राम दाम्पत्यांनी पत्र परिषदेत दिली.
शिक्षण हक्क कायद्यानुसार, प्रत्येकाला शिक्षणाचा हक्क आहे. मुलांना शिक्षण मिळत नसल्याने चिंतेचा विषय बनला असून, त्यांचे शैक्षणिक नुकसान झाले आहे. दरम्यान मागील दोन वर्षांपासून टीसी काढण्याची मागणी करीत मेश्राम दाम्पत्यांनी शाळेकडे वारंवार विनंती केली.
शिक्षण विभागाचे दुर्लक्ष?
पिंपळगाव जि.प शाळेतर्फे देखील विनंती करण्यात आली. परंतु एआयएम पब्लिक स्कुल शाळेचे मुख्यध्यापिका यांनी फी साठी तगादा लावला. त्यामुळे स्वानंद याला मागील तीन वर्षांपासून शिक्षनापासून वंचित राहावे लागले. शैक्षणिक नुकसान झाल्यामुळे स्वानंद नेहमीच तणावात राहत असतो.
याला जवाबदार कोण? एकीकडे शासनाचे मोफत आणि शक्तीचे शिक्षण देण्याचे धोरण आहे. याबाबतीत गटशिक्षणाधिकारी यांना सण २०२१ मध्ये माहिती दिली.परंतु शिक्षण विभागाकडून साधी दखलही घेण्यात आली नाही. जैसे तैसे तेजसचा प्रवेश एका खासगी शाळेत करण्यात आला.
आई-वडील मुलांना शिकवण्यास तयार आहेत. परंतु एआयएम पब्लिक स्कुल टीसी देत नसल्याने शिकवायचे कसे? मुलगा शाळेत जात नाही. त्यामुळे मुलांना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे. मुलगा मानसिक तणावात राहत असून, उद्या जीवाला कमी-जास्त केले तर याला जवाबदार कोण?
असा सवाल आई-वडिलांनी पत्र परिषदेत उपस्थित केला. यावेळी माजी सिनेट सदस्य प्रवीण उदापुरे, वंचित बहुजन आघाडी तालुका अध्यक्ष श्रीकांत नागदेवे हजर होते. त्यांनी या प्रकरणात दोषी शिक्षण विभाग व शाळा प्रशासनावर कारवाई करण्याची मागणी केली आहे.