सिटी टाइम्स ऑनलाईन लखनऊ | बहुजन समाज पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष मायावती यांनी बुधवारी पक्षाच्या प्रदेश कार्यालयात पदाधिकारी यांची बैठक घेतली. बसपा सुप्रीमो मायावती म्हणाल्या की, काँग्रेसप्रमाणेच जनतेला आता भाजपपासूनही स्वातंत्र्य हवे आहे.
दोघांचे बोलणे आणि वागणे सारखेच आहे आणि त्यामुळेच बसपा कोणाशीही युती करणार नाही. लोकसभा निवडणूक त्या स्वबळावर लढवणार आहेत.
हेही वाचा | Chandrayaan-3: ची लैंडींग हा विकसीत भारताचा अविस्मरणीय क्षण प्रधानमंत्री नरेंद्र मोदी
मायावती यांनी कार्यकर्त्यांना लोकसभा निवडणुकीच्या तयारीत प्रभावीपणे सहभागी होण्याचे आवाहन केले. महागडया निवडणूक प्रदर्शनांपासून दूर राहून छोट्या सभांच्या बळावर पक्ष मजबूत करा असे ते म्हणाल्या.
निवडणुकीत युती करून बसपाला नफ्याऐवजी तोटा सहन करावा लागला आहे. बसपाचे मत दुसऱ्या पक्षाकडे जाते पण इतर पक्षांची आपली व्होट बँक बसपाकडे हस्तांतरीत होत नाही.
बसपा आता काँग्रेस व भाजपा या दोघांपासून दूर राहणार आहे. भाजपच्या संकुचित आणि जातीयवादी राजकारणामुळे जनजीवन दयनीय आणि त्रस्त झाले आहे.
भाजप व काँग्रेस हे दोन्ही पक्ष त्यांचे जनता पाठबळ गमावीत आहे. यामुळेच लोकसभा निवडणूक एकतर्फी नसून रंजक होणार आहे.
हेही वाचा | आदिवासी उमेदवारांनी कर्जयोजनेसाठी अर्ज करावेत
त्याचा फायदा बसपाला मिळेल. ही निवडणूक राजकारणाला नवे वळण देणारी ठरणार आहे. काँग्रेस व भाजपच्या अन्यायी धोरणामुळे मूठभर लोक सोडले तर देशातील बहुजन समाजातील लोकांना आपले कुटुंब सांभाळणे कठीण होत आहे.
हेही वाचा | AISF च्या वतीने भंडारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महाधरणे आंदोलन
त्याचा संपूर्ण परिणाम लोकसभा निवडणुकीवर दिसून येईल. देशातील गरीब, मजूर, दलित, मागासलेले, धार्मिक अल्पसंख्याक इ.चे भाजप व काँग्रेसच्या विषमतावादी धोरणांमुळे आणि कार्यशैलीमुळे नुकसान झाले आहे.
बैठकीत त्यांनी सर्व क्षेत्रांचा आढावा घेतला. यावेळी राष्ट्रीय समन्वयक आकाश आनंद, राष्ट्रीय महासचिव सतीशचंद्र मिश्रा, प्रदेशाध्यक्ष विश्वनाथ पाल, मुंकद अली, शमशुद्दीन रैन आदी उपस्थित होते.