अतुल नागदेवे लाखनी | समाजातील वेगवेगळ्या क्षेत्रांत काम करून लोकसेवा करण्याचे काम हाती घेतले आहे. यातून परिवर्तन घडवून आणण्याचा मानस आहे. विधानसभा निवडणुकीच्या माध्यमातून हे साध्य होऊ शकते. त्यामुळे संधी मिळाल्यास, नक्कीच संधीच सोनं करू अशी माहिती भाजपा जिल्हा सचिव डॉ.विजया ठाकरे नंदुरकर यांनी लाखनी येथील रानभाजी महोत्सवा दरम्यान, कार्यक्रमाप्रसंगी दिली.
समाजाला आर्थिकदृष्ट्या बळकट व्हायचे असेल तर स्थानिक समस्या सोडवून रोजगारनिर्मिती केली पाहिजे, असे मत डॉ. विजया ठाकरे नंदुरकर यांनी दि. १३ ऑगस्ट रोजी लाखनी येथील कार्यक्रमाप्रसंगी बोलताना व्यक्त केले.
दरवर्षी विविध आरोग्य विषयक शिबिर, विद्यार्थ्यांना पुस्तक, वह्यांचे वाटप असे समाजोपयोगी अनेक उपक्रम त्यांनी राबविले आहेत.अशा कामांना अधिक गतिमान करीत मुर्तरूप आणण्याच्या दृष्टीने काही गोष्टींची गरज असते. साकोली विधानसभा क्षेत्रातील विकास व ग्रामीण परिसरातील पायाभूत सुविधांचे प्रश्नही सोडविने गरजेचे आहे. क्षेत्राचे विकासाकरिता संघर्षाशिवाय पर्याय नाही.
साकोली विधानसभा क्षेत्रातील शेतकरी, शेतमजूर व सर्वसामान्य नागरिकांचे जीवनमान तथा आर्थिकस्तर उंचावणे, विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाची संधी उपलब्ध करून पदवीधर, सुशिक्षित बेरोजगारांचे प्रलंबित नोकरी आणि औद्योगिक विकास साधण्याचा मानस बाळगणारे भाजपा जिल्हा सचिव डॉ. विजया ठाकरे नंदुरकर यांनी साकोली विधानसभा क्षेत्राचा विकास व रोजगार निर्मितीसाठी अविरत लढा देणार असल्याची माहिती दिली.