टीम सिटी टाइम्स लाखनी | राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंतीच्या शुभ पर्वावर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे बहुद्देशीय कलावंत परिषद केसलवाडा/पवार चे वतीने ३० सप्टेंबर व १ ऑक्टोबर २०२३ रोजी ग्रामपंचायत कार्यालय मासलमेटा चे प्रांगणात जिल्हा सर्वस्तरिय कलावंताचा २ दिवशीय भव्य मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
बिबट्याचे हल्ल्यात तीन शेळ्या ठार : सेलोटी येथील घटना
उद्घाटक माजी पालकमंत्री डॉ. परिणय फुके, सहउद्घाटक डॉ. गजानन डोंगरावर, अध्यक्षस्थानी अभियंता विकास पटले, दीप प्रज्वलक अभियंता वसंता येळेकर, डॉ. सतीश नंदेश्वर, स्वामी कन्स्ट्रक्शन चे रामेश्वर बीसेन, प्रमुख अतिथी मासलमेटा च्या सरपंच आचल फेंडर, जिल्हा परिषद सदस्या सूर्मिला पटले, केसलवाडा/पवार च्या सरपंच रोमिला बीसेन,
परसोडीच्या सरपंच रेवता पटले, विशेष अतिथी उपसभापती गिरीश बावनकुळे, डॉ. महेंद्र गणवीर, भूवैज्ञानिक राजानंद बोदेले, शिवसेना प्रमुख पुरुषोत्तम टेंभरे, धनंजय घाटबांधे, जि.प. सदस्य गणेश निरगुळे, विनोद बांते, एकनाथ फेंडर, नरेश इश्र्वरकर, मासलमेटा चे उपसरपंच शीलवंत तिरपुडे, कृउबास सभापती शिवराम गिरेपुंजे, पोलिस पाटील भूपेंद्र शामकुवर, प. स. सदस्य सुनील बांते, धान्य व्यापारी संजय बिसेन, ॲड. सरोज रामटेके,
तंमुस अध्यक्ष उमाकांत गणवीर, डॉ. नारद पटले, अभियंता दिनेश येळेकर, शैलेश गजभिये, शेतकरी संघाचे अध्यक्ष मनोज पटले, खुर्शीपार चे पोलिस पाटील विशाल कोडवते, पॅकेज समिती सदस्य वसंता कुंभरे, कृउबास संचालक श्रावण कापगते, अभियंता प्रदीप राहांगडाले, लाखोरी चे सरपंच सुधीर चेटूले, सालेभाटा चे सरपंच खूमेश बोपचे, विविध कार्यकारी सेवा
सहकारी संस्था, समता सैनिक दल, तंटामुक्त समिती मासलमेटा चे सर्व पदाधिकारी आणि मान्यवरांचे प्रमुख उपस्थितीत होणार आहे. त्यात सुरेंद्रजी पाटील चोरे खापा सावनेर जिल्हा नागपूर, भीमशाहीर प्रदीप कळबे रामटेक आणि इतर कलावंतांचा सत्कार करण्यात येणार आहे.
तसेच जिल्हा परिषद सदस्य सूर्मीला अशोक पटले यांचेकडून महाप्रसाद वितरण केले जाणार आहे. तरी या सर्वस्तरीय कलावंत मेळाव्याचा जास्तीत जास्त संख्येने आस्वाद घेण्याचे आवाहन अण्णाभाऊ साठे बहुद्देशिय कलावंत परिषद केसलवाडा/पवार चे शाहीर मोरेश्वर वंजारी यांनी केले आहे.