सिटी टाइम्स ऑनलाईन | लाखनी येथील पंचायत समिती चे अधिनस्त असलेल्या जिल्हा परिषदेच्या शाळेत आवश्यकतेनुसार नवीन वर्गखोल्यांचे बांधकामासाठी आर्थिक वर्ष २०२२-२३ मध्ये जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत १ कोटी रुपये तसेच जुन्या मोडकळीस आलेल्या वर्ग खोल्यांच्या दुरुस्ती करिता ३५ लाख असा एकूण १ कोटी ३५ लाख रुपये निधी उपलब्ध करण्यात आला आहे. यातून १० नवीन वर्ग खोल्यांचे बांधकाम तर ८ वर्ग खोल्यांची दुरुस्ती होणार असल्याचे समग्र शिक्षा अभियानाचे कनिष्ठ अभियंता योगेश मते यांनी सांगितले.
हेही वाचा | अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून केले गर्भवती
ग्रामीण परिसरातील दारिद्र्य रेषेखालील, गरीब कुटुंबातील होतकरू व हुशार विद्यार्थ्यांची गाव आणि परिसरात प्राथमिक शिक्षणाची सोय व्हावी. या करिता जिल्हा परिषदेच्या माध्यमातून पंचायत समिती चे अधिनस्त शाळांचे संचालन केले जाते. लाखनी तालुक्यात जिल्हा परिषदेच्या १ ते ७ पर्यंत च्या प्राथमिक शाळा ८८ असून माध्यमिक शाळा ५ आहेत.
हेही वाचा | धान पिकावर रोग आणि किडीचा प्रादुर्भाव ; धान उत्पादक हवालदिल
काही शाळांत भौतिक सुविधा उपलब्ध असल्या तरी काही शाळांमध्ये नाहीत. अनेक शाळांच्या इमारती फार पुरातन असून मोडकळीस आलेल्या आहेत. तर काही ठिकाणी वर्गखोल्या अभावी इयत्ता १ ते ४ पर्यंतच्या विद्यार्थ्यांना एकाच वर्ग खोलीत शिक्षण घ्यावे लागते. या प्रकाराने विद्यार्थ्यांची गैरसोय होते.
हेही वाचा | कराडे मास्तराच्या कानशिलात लगावल्याची ‘ ती ‘ बातमी निव्वळ अफवा
विद्यार्थ्यांची गैरसोय टाळण्यासाठी महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यांचे ९ जून २०२२ चे शासन निर्णयानुसार जिल्हा नियोजन समिती सदस्य सचिव तथा जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांचे मार्फत आर्थिक वर्ष २०२२-२३ मध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रेंगेपार/कोठा, किन्ही, खैरी, कोलारी, पळसगाव, देवरी, मरेगाव,
बोरगाव आणि पोहरा ह्या १० शाळांना प्रती वर्ग खोली १० लाख प्रमाणे १ कोटी रुपयाचा निधी मंजूर करण्यात आला असून, वर्ग खोली दुरुस्तीकरिता जिल्हा परिषद प्राथमिक शाळा केसलवाडा ५ लाख, धानला ४ लाख, पिंपळगाव ५ लाख, सोनमाळा ४ लाख, कन्हाळगाव ५ लाख, पालांदूर ४ लाख, मानेगाव ५ लाख, कनेरी ३ लाख ह्या ८ शाळांना ३५ लाख रुपये असा एकूण १ कोटी ३५ लाख रुपये निधी उपलब्ध करण्यात आलेला आहे.
हेही वाचा | रानडुकराच्या हल्ल्यात महीला गंभीर
समग्र शिक्षा अभियान जि.प. भंडारा चे कार्यकारी अभियंता सुशील कान्हेकर यांचे मार्गदर्शनात कनिष्ठ अभियंता योगेश मते यांचे तांत्रिक मार्गदर्शन, सनियंत्रण व देखरेखीखाली नवीन वर्ग खोली आणि वर्ग खोली दुरुस्तीची कामे केली जाणार आहेत.