रोशन खोब्रागडे लाखनी | मुरमाडी-सावरी येथील महाप्रज्ञा बुद्धविहारात दि. ३० मे २०२४ रोजी भारतीय बौद्ध महासभेच्या लाखनी तालुका कार्यकारीणीची सभा घेवून जुनी कार्यकारीणी विसर्जीत करून नव्या कार्यकारीणीची घोषणा करण्यात आली.
यावेळी भारतीय बौद्ध महासभेचे भंडारा जिल्हाध्यक्ष प्राणहंस मेश्राम व जिल्हा सरचिटणीस हरकर उके उपस्थीत होते. त्यांनी नवीन कार्यकारीणी यादी जाहीर केली ती येणेप्रमाणे भारतीय बौद्ध महासभा लाखनी तालुकाध्यक्ष सी. के लेंढारे , सचीव – विठ्ठल गणवीर , कोषाध्यक्ष –
केशव रामटेके , संस्कार उपाध्यक्ष – रोशन खोब्रागडे व इतर सर्व कार्यकारीणी भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हाध्यक्ष प्राणहंस मेश्राम व जिल्हा सरचिटणीस हरकर यांच्या उपस्थितीत नवीन कार्यकारीणीचे गठन करण्यात आले.
यावेळी सभेला संबोधित करताना नवनिर्वाचित तालुकाध्यक्ष सी.के लेंढारे म्हणाले की , संपूर्ण विश्वात व भारत देशाच्या कानाकोपरात भगवान बुद्धाचे समतावादी विचार पोहचावेत तसेच भगवान बुद्धाने प्रतिपादीत केलेल्या अष्टांगीक मार्गाचा सर्व विश्वातील जनमाणसाने अंगीकार करून आपले जीवन सुखमय व समृद्धशाली बनवावे या उदात्त हेतूने बोधिसत्व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय बौद्ध महासभेची निर्मिती केली होती.
महामानवाचा धम्मविचार चिरकाल टिकावा म्हणून महाउपासीका मीराताई यशवंत आंबेडकर यांनी भारतीय बौद्ध महासभेची धुरा आपल्या खांदयावर घेतली व आजतागायत भारतीय बौद्ध महासभा सुरळळीतपणे धम्मप्रचार व प्रसाराचे कार्य प्रत्येक खेडयापाडयात जावून करीत आहे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक भाषण हरकर उके यांनी सादर केले. सूत्रसंचालन केशव रामटेके यांनी तर आभार प्रदर्शन डॉ. रेवाराम खोब्रागडे यांनी केले.