टीम सिटी टाइम्स | सध्या पावसाळा सुरू आहे. पावसाळ्यात जलजन्य आणि साथिच्या आजाराला सामोरे जावे लागते. अशावेळी योग्य आणि पूरक आहार घेतला नाही तर कालांतराने मोठ्या आजाराचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे साथिच्या आजारात योग्य आणि पूरक आहार घेणे आवश्यक आहे.
हेही वाचा | येणारे सन व उत्सव शांततेत पार पाडावे : पोलिस निरीक्षक मिलिंद तायडे यांचे प्रतिपादन
असे प्रतिपादन समर्थ महाविद्यालयातील गृहअर्थशास्त्राच्या प्राध्यापिका प्रा. डॉ. अर्चना निसाळ यांनी केले. त्या लाखनी येथील गुजरी परिसरात गृहभेटी दरम्यान साथीच्या आजारावर जनजागृती कार्यक्रमात मार्गदर्शक वक्त्या म्हणून बोलत होत्या.
प्रभाग क्र. १४, स्थानिक गुजरी चौक व इतर प्रभागात साथिच्या आजाराविषयी जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला. या दरम्यान स्थानिक नागरीकांसह शासकीय रुग्णालयातील वरिष्ठ परिचारीका दहिकर उपस्थित होत्या. यावेळी प्रभाग क्र. १४ येथे मार्गदर्शन करतांना त्यांनी गृहभेटी दिल्या. या वेळी साथिचे आजार कसे होतात.
हेही वाचा | हलक्या प्रतीच्या गर्भार धानास पावसामुळे संजीवनी
यानंतर आहार कोणता घ्यावा, पिण्याचे पाणी कसे असले पाहीजे, शुद्ध पाणी कसे ठेवता येईल, आजारी व्यक्तीने स्वतःची काळजी कशी घ्यावी. यासारख्या आरोग्यविषयक बाबिवर जनजागृती कार्यक्रम दरम्यान मार्गदर्शन करण्यात आले.