namo shetkari yojana 1st installment date 2023 : शेतकऱ्यांना सरकारमार्फत पीएम किसान योजना या योजना अंतर्गत वर्षाला ६००० रुपये दिले जाते, त्याचबरोबर शेतकऱ्यांचा विचार करून राज्य सरकारतर्फे पुन्हा एक योजना सुरू करण्यात आली आहे, ती योजना म्हणजे नमो शेतकरी महासन्मान योजना. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना वर्षाला ६ हजार रुपये दिले जाणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदीं यांनी नुकताच (Pm Kisan) पीएम किसान सन्मान निधी या केंद्र सरकारच्या योजनेचा 14 वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला आहे. राज्यासह देशभरातील साडे आठ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यावर 17 हजार कोटी रुपये जमा करण्यात आले आहे.
यामुळे शेतकरी वर्गात सगळीकडे राज्य सरकारच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा पहिला हप्ता कधी मिळणार याची चर्चा राज्यात सुरू झाली आहे.
राज्य सरकारकडून पहिला हप्ता कधी मिळणार?
namo shetkari yojana 1st installment date 2023 : केंद्र सरकार शेतकऱ्यांना (Pm Kisan ) पीएम किसान सन्मान निधी या योजनेअंतर्गत दरवर्षी 6 हजार रुपये देत आहे. याकरिता दर 4 महिन्यांनी 2 हजारांचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला जातो. केंद्राच्या धर्तीवर राज्य सरकारने सुद्धा गेल्या अधिवेशनात ‘नमो शेतकरी महासन्मान निधी’ योजना राबवण्याचे जाहीर केले.
namo shetkari yojana 1st installment date 2023 : पण या योजनेची अंमलबजावणी कधीपासून सुरू होईल आणि शेतकऱ्यांना पहिला हप्ता कधी मिळेल? याविषयी अधिक माहिती देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सांगितले आम्ही राज्य सरकारने देखील नमो महासन्मान शेतकरी योजना यावर्षी सुरू केलेली आहे.
पुढच्या महिन्याभरात तोही कार्यक्रम सुरू होईल. त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना केंद्र सरकारचे 6 आणि राज्य सरकारचे 6 असे एकूण 12 हजार रुपये मिळणार देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
हेही वाचा | राष्ट्रवादी काँग्रेस मधील फुट महाराष्ट्रातील जनतेला खरंच तारणार ?
हेही वाचा | 30 कोटी 90 लाखांच्या सौंदर्यीकरण मंजूरी! खा. सुनील मेंढे यांच्या प्रयत्नाला यश
हेही वाचा | फुले-शाहू-आंबेडकरांचा पुरोगामी महाराष्ट्र निर्माण करण्याचा संकल्प करूया – विजय वडेट्टीवार
हेही वाचा | … तर मी नक्षलवादी झालो असतो – विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार