टीम सिटी टाइम्स नागपूर | धाराशिव उस्मानाबाद येथे 16 ते 20 नोव्हेंबर 2023 या कालावधीत होणाऱ्या 65 व्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेकरिता आपल्या शहराची निवड चाचणी रवींद्र हजारे व्यायामशाळा पुनापूर पारडी येथे दि. 29 ऑक्टोंबरला 2023 रविवारी पार पडली.
कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून पूर्व नागपूरचे आमदार कृष्णाजी खोपडे यांनी प्रामुख्याने उपस्थिती दर्शविली व पैलवानांना आशीर्वाद दिला. स्पर्धा निरीक्षक गणेश कोहळे उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद, स्पर्धा प्रमुख म्हणून हरिहरजी
भवाळकर नागपूर नगर आखाडा संघटन अस्थाई समिती, दिलीपजी इटणकर माझी क्रीडा अधिकारी, अनिलजी आदमने सचिव नागपूर जिल्हा, रमेशजी खाडे, रवींद्रजी हजारे, कृष्णानंद पांडे, प्रभाकर हिंगणेकर, रमेश नंदनकर होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निलेश राऊत यांनी केले. तर पंच म्हणून रामचंद्र यंगड, गिरीश हरडे महेश काळे व निकिता लांजेवार यांनी कार्य केले.
गादी विभग
57 कि. रितिक अंबोने हजारे व्यायामशाळा,
61 कि. यश कोठांगळे स्टार अकॅडमी,
65 कि.आदित्य पडोळे नागपूर अकॅडमी,
70 कि. चेतन हजारे हजारे व्यायामशाळा,
74 कि. यश मेश्राम नागपूर अकॅडमी,
79 कि. लकी पारधी मृगयास्वामी
व्यायामशाळा
86 कि. रमण कोतळे रामाराव अमृते व्यायामशाळा,
92 कि. कार्तिक भांडे रामराव अमृते व्यायामशाळा,
97 कि. चेतन गारघाटे नागपूर अकॅडमी,
125 कि. तिलक यादव रामराव अमृते व्यायामशाळा.
माती विभाग
57.कि. इंद्रजीत पटले हजारे व्यायामशाळा,
61 कि. हातिम अली लखमाजी व्यायामशाळा
65.कि. आकाश ठवकर हजारे व्यायामशाळा,
70 कि. आकाश वैद्य रेशीम बाग व्यायामशाळा,
74 कि. रोहित शेंडे सुदर्शन स्पोर्टिंग क्लब,
79 कि. कोमल मळावी नागपूर अकॅडमी,
86 कि. साहिल जांभुळकर रामाराव अमृते
व्यायामशाळा
92 कि. विजय मुळे हजारे व्यायामशाळा,
97 कि. तेजस मेश्राम हनुमान व्यायामशाळा कॉटन मार्केट, 125 कि. विशाल डाके रामाराव अमृते व्यायामशाळा इत्यादी.