सिटी टाइम्स ऑनलाईन | नागपूर येथील हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका १६ वर्षीय अल्पवयीन शाळकरी विदयार्थीनीवर ओळखीच्याच तरूणाने अत्याचार करून तिला गर्भवती केले.
हेही वाचा | धान पिकावर रोग आणि किडीचा प्रादुर्भाव ; धान उत्पादक हवालदिल
प्राप्त माहीतीनुसार आकाश हेमराज खोब्रागडे रा. हुडकेश्वर , नागपूर वय २५ वर्ष असे आरोपी तरूणाचे नाव आहे. सदर तरूणाने पिडीत विदयार्थीनीशी मैत्री करून तिला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढले.
नंतर त्याचे तिच्या घरी येणे-जाणे सुरूच होते. दि. १५ फेब्रुवारी २०२२ रोजी त्याने तिच्या मर्जीविरूद्ध तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवले. नंतर तो वारंवार धमकी देवून तिचे शारीरिक शोषण करायचा. त्यामुळे त्या अल्पवयीन मुलीला दिवस गेले.
हेही वाचा | कराडे मास्तराच्या कानशिलात लगावल्याची ‘ ती ‘ बातमी निव्वळ अफवा
आपली मुलगी गर्भवती असल्याचे कळताच आई-वडीलांनी तिला यासंदर्भात विचारणा केली तर तिने हे दुष्कृत्य आकाशने केल्याचे सांगीतले. त्यावरून पालकांनी गर्भवती मुलीसह हुडकेश्वर पोलिस ठाण्यात धाव घेतली.
अल्पवयीन मुलीच्या तक्रारीवरून पोलीसांनी आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल करून तपास सुरू आहे.
हेही वाचा | रानडुकराच्या हल्ल्यात महीला गंभीर