टीम सिटी टाइम्स लाखनी | मराठी चित्रपट म्हटलं की , लक्ष्मीकांत – आशोक सराफ यांची धमाल जोडी आठवते. तीस दशकांपूर्वी या धमाल जोडीने प्रेक्षकांना जणू भूरळच घातली होती. तेव्हापासून मराठी चित्रापट पाहणाऱ्या प्रेक्षकांच्या संख्येत लक्षणीय वाढ दिसून आली व आताही आहे.
आजघडीला अनेक तरूण निर्माते मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करून मराठी रंगभूमीला एक विशेष दर्जा प्राप्त करून देत आहेत. निर्माता नागराज मंजुळे यांचा ” सैराट ” हा त्याचे उत्तम उदाहरण आहे. सामान्य कुटुंबात जन्मलेल्या नागराज मंजुळेने तर कमालच केली. त्यांच्या कार्याने अनेक नवोदित तरूण निर्मात्यांना प्रेरणा मिळाली आहे व त्यांनी मराठी चित्रपट निर्मीती क्षेत्रात आपले कौशल्य दाखवायला सुरूवात केली आहे. अशाच एका नवोदित निर्मात्यांपैकी एक कर्तबगार व हौसी निर्माता राकेश कुमार आहे.
लाखनी येथील वास्तव्यास असलेले राकेश कुमार यांची ‘अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या ‘संचालक’ पदी नियुक्ती करण्यात आली आहे. चित्रपट निर्माते राकेश कुमार यांच्या ‘जी. आर. फिल्म्स’ या बॅनर अंतर्गत ‘दंगा’ मराठी चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात एक मार्च रोजी प्रदर्शित होत आहे. ‘दंगा’ चित्रपट सामाजिक समस्या व प्रेमकथा यांचे मिश्रण असलेला, सुमधुर गाण्यांची पर्वणी घेऊन प्रेक्षकांच्या भेटिला एक मार्च येत आहे. राकेश कुमार यांचे मूळ नाव राकेश गद्देकर असून ते एक प्रसिद्ध होमिओपॅथीक तज्ज्ञ म्हणून लाखनीला प्रैक्टीस करायचे.
वैद्यकीय शिक्षणासोबत राकेश कुमार यांच्यात कथालेखन व गितलेखनाचे उपजतच गुण होते. यामुळे त्यांना चित्रपटसृष्टीचे विशेष आकर्षण होते. ते अल्पावधीतच चित्रपटसृष्टीत उत्तम कथा, पटकथा लेखक व गितकार म्हणून नावाजलेले गेले आहेत.
लाखनी शहरातून गेलेल्या या निर्मात्याने मराठी चित्रपटसृष्टीत नुकतेच पदार्पण केले आहे. अखिल भारतीय मराठी चित्रपट निर्मिती महामंडळात त्यांची नुकतीच २०२४ च्या संचालकपदी नियुक्ती झाली आहे. त्यांना २०२३ च्या ४ थ्या दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय मराठी चित्रपट महोत्सवात प्रोत्साहन पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले आहे.
राकेश कुमार यांनी जी.आर फिल्मस या बैनर अंतर्गत ” दंगा ” हा मराठी चित्रपट तयार केला आहे. सामाजिक समस्या , प्रेमकथा व सुमधुर गीतांचे मिश्रण असलेला हा मराठी चित्रपट येत्या एक मार्चमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटाची निर्मिती रमीझ हत्तुर यांची असून राकेश कुमार हे दिग्दर्शक आहेत. विष्णू पाटील यांचे संगीत व सहदिग्दर्शन आहे.
फिरोज अलीम , आर्यन अविनाश गाडेकर व स्मिता निमजे हे सहदिग्दर्शक आहेत. प्रवीण कुँवर , जसराज जोशी व ज्योती भांडे यांच्या सुमधूर आवाजाची साथ चित्रपटाला लाभलेली आहे. दंगा हा चित्रपट प्रेक्षकांना नक्कीच आवडेल यात तिळमात्रही शंका नाही.
कथालेखन व गीतलेखनात उपजत कलाकौशल्य लाभलेले राकेश गाडेकर हे व्यवसायाने होमीओपैथी तज्ञ आहेत. त्यांनी चार वर्षाअगोदर लाखनीसारख्या शहरात वैदयकीय सेवा पुरवीली आहे. शिक्षकी पेशा असलेल्या वडीलांच्या पोटी जन्मलेल्या राकेश कुमार यांचे एक उत्तम पटकथा लेखक व गीतकार मराठी चित्रपटसृष्टीत नाव गाजलेले आहे. यामुळे लाखनी तसेच भंडारा जिल्ह्याचे नाव चित्रपटसृष्टीत राकेश कुमार यांच्या रूपाने नोंदले गेले आहे. राकेश कुमार यांच्यावर सगळीकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.