टीम सिटी टाइम्स जालना | महाराष्ट्रातील जालना जिल्ह्यात मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या आंदोलनाला शुक्रवारी हिंसक वळण लागले. त्यात ३८ पोलिस कर्मचाऱ्यांसह अनेक जण जखमी झाले. अंबड तालुक्यातील धुळे-सोलापूर रस्त्यावरील अंतरवली सारथी गावात हिंसक जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज केला.
हेही वाचा | “त्या” अट्टल घरफोड्यांची कारागृहात रवानगी
प्राप्त माहीतीनुसार महाराष्ट्रातील जालना जिल्ह्यात मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या आंदोलनाचे आंदोलकर्ते आणि पोलिसांमध्ये हाणामारी झाली. जालना जिल्ह्यातील अंतरवली सराटी येथे मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्यांवर पोलिसांनी लाठीमार केला. या लाठीमारात अनेक लोक आणि पोलीस जखमी झाले आहेत. काही जखमींनी अंतरवली गावातील खासगी रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले होते.
आंदोलनादरम्यान पोलिसांनी लाठीचार्ज केल्याचा आरोप
करताना डॉक्टरांनी सांगितले की, ३० ते ४० लोक त्यांच्याकडे प्राथमिक उपचारासाठी आले होते. काही लोकांच्या अंगावरील लोखंडी गोळ्याही काढण्यात आल्या असून त्यांना प्राथमिक उपचार देऊन सोडून देण्यात आले आहे.
हेही वाचा | जागतिक तापमानवाढ : एक गंभीर समस्या
जखमींनी सांगितले की, ते मराठा समाजाच्या आरक्षणासाठी आंदोलन करत होते मात्र आंदोलनादरम्यान पोलिसांनी लाठीमार केला यात सर्व महिला-पुरुष तसेच लहान मुले, वृद्ध जखमी झाले.
एकून ३८ पोलीस जखमी झाल्याची माहिती
प्राप्त माहितीनुसार मध्य महाराष्ट्रातील जालना जिल्ह्यात मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागल्यामुळे त्यात ३८ पोलिस कर्मचाऱ्यांसह अनेक जण जखमी झाले असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
अंबड तालुक्यातील धुळे-सोलापूर रस्त्यावरील अंतरवली सारथी गावात हिंसक जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज आणि अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या. पोलिसांनी हवेत काही राऊंड गोळीबार केल्याचा दावाही गावकऱ्यांनी केला मात्र अधिकाऱ्यांनी याला दुजोरा दिला नाही.