टीम सिटी टाइम्स लाखनी | गेले अनेक दिवस परतीचा पाउस शेतकर्यांच्या मुळावर उठल्यामुळे लाखनी तालुक्यातील धान शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. धान पिकातील धानाच्या लोंब्यामध्ये दाणा तयार झाला असून त्यातच (दि.13) ऑक्टोबर रोजी तालुक्यातील अनेक गावामध्ये परतीचा पाऊस पडल्याने तसेच सुटलेला सोसाट्याचा वाऱ्यामुळे उभा असलेला धान भुईसपाट झाला आहे.
तर, काही ठिकाणी हलक्या प्रजातीचा धानपीक कापणी योग्य झाला आहे. मात्र, परतीचा पाऊस पडल्याने धान कापणी केली तर हातामध्ये हवे तेवढे धान्य मिळणार नाही, अशी भीती शेतकरी वर्ग व्यक्त करीत आहेत.
दरवर्षी धान लागवड करायची आणी शेवटच्या क्षणाला होणार्या धान्यशेतीच्या नुकसानामुळे मातीत टाकलेला पैसा धान्याच्या माध्यमातून मिळत नसल्यामुळे शेतकरी वर्ग मोठ्या अर्थिक संकटात सापडले आहे. सध्या काहींचे धान शेती कापण्यायोग्य झाली असूनही परतीच्या पावसामुळे होणारे धानशेतीचे नुकसान नुसते पाहण्याच्या पलीकडे दुसरा पर्याय नसल्यामुळे शेतकरी हवालदील झाला आहे.
परतीच्या पावसाच्या अस्मानी संकटाचा दरवर्षी शेतकरी वर्गाला सामना करावा लागत असल्यामुळे धानशेतीचे प्रमाण कमी होत आहे. मात्र, असे असले तरी सुद्धा लाखनी तालुक्यात गेल्या काही वर्षात तुरळक स्वरूपात धान शेतीचे लागवड करण्यास वाढ झाली आहे. मात्र, परतीच्या पावसाची दहशत आजही बळीराजाला चिंताग्रस्त करून ठेवले आहे. त्याचप्रमाणे तालुक्यातील पिकावरील लष्करी अळीच्या प्रकोपाने शेतकरी हवालदील झाले आहेत.
प्रत्येक शेतकरी दरवर्षी अस्मानी-सुलतानी संकटात अडकलेला असतो, मात्र, यावर्षी तर हाताशी आलेला धानपीक परतीच्या पावसाने व लष्करी अळीमुळे शेतकरी मोठ्या शंकटात सापडलेला आहे. त्यामुळे शासनाणे या बाबींची तात्काळ दखल घेऊन, लाखनी तालुका दुष्काळ ग्रस्त घोषित करावे.
-धनंजय लोहबरे
शेतकरी संघटना जिल्हा अध्यक्ष
लाखनी तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांची शेती 50% भुईसपाट झाली असून, शासनाने त्वरित पंचनामे करून लाखनी तालुका दुष्काळ ग्रस्त घोषित करावे.
-दादू खोब्रागडे
पंचायत समिती सदस्य लाखनी