टीम सिटी टाइम्स भंडारा | लाखनी तालुक्यातील ग्रामीण रुग्णालय येथे वयोश्री योजनेच्या नावाखाली ३००० रूपयांसह काही साहित्य देखील मिळणार आहे, अशी खोटी वार्ता पसरली आणि यानंतर गुरूवारी सकाळपासून शेकडो ज्येष्ठ नागरिकांनी ग्रामीण रुग्णालयात एकच गर्दी केली. दरम्यान, अपुऱ्यासोयी अभावी वृद्धाची हेडसांड होताना दिसली.
याबाबीची शहानिशा करण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे तालुका अध्यक्ष श्रीकांत नागदेवे यांनी वैदकीय अधिकाऱ्यांची भेट घेतली. सदर योजनेबद्दल माहिती विचाराना केली. यावेळी वैदकीय अधिकाऱ्यांनी सांगितले, अश्या कुठल्याही योजनेचे आयोजन रुग्णालयतर्फे करण्यात आले नाही.
मात्र, आजारी जेष्ठाना चष्मे, कानाची मशीन, असे विविध आजाराच्या साहित्याची वाटप करण्यात येणार होती अशी माहिती वैदकीय अधिकाऱ्यांनी दिली.परंतु रुग्णालयात उपस्तिथ जेष्ठ नागरिकांनी सांगितले, गावातील आशा सेविकांनी वयोश्री योजनेचे तीन हजार रुपये मिळणार अशी माहिती दिली.त्यामुळे तालुक्यातील वृद्धानी एकच गर्दी ग्रामीण रुग्णालयात केली होती.
सदर योजनेची खोट्या प्रकारची माहिती प्रसार करण्यात आला त्यामुळे गर्दी केल्याचे निष्पन्न झाले. खोटी माहिती प्रसार करणाऱ्यावर गुन्हे दाखल करण्यात यावे अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे तालुका अध्यक्ष श्रीकांत नागदेवे यांनी केली आहे.यावेळी नेहाल कांबळे,धीरज गोस्वामी रुग्णालयात उपस्तिथ होते.