ISRO : नवी दिल्ली भारताने चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर विक्रम लँडरचे सॉफ्ट लँडिंग केले आहे. या पार्श्वभूमीवर इस्रोने आता विज्ञान आणि शोधांना प्रोत्साहन देण्यासाठी प्रश्नमंजुषा सुरू केली आहे. या प्रश्नमंजुषातील प्रथम विजेत्याला लाखांचे बक्षीस दिले जाईल.
हेही वाचा | शिक्षकदिनी शिक्षक संघटना आंदोलनाच्या पावित्र्यात
सविस्तर वृत्त हेच आहे की , भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) ने चांद्रयान- ३ मोहिमेवर महा प्रश्नमंजूषा सुरू केली आहे. यामध्ये सर्व भारतीय भाग घेऊ शकतात. भारताचा चंद्रावरील प्रवास लोकसहभागाने साजरा करण्याच्या उद्देशाने ही प्रश्नमंजूषा सुरू करण्यात आली आहे. यांमधील सर्वोत्कृष्ट विजेत्याला एक लाख रुपयांचे बक्षीस दिले जाईल.
ISRO सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर सांगितले की, चंद्राच्या चमत्कारांचे अन्वेषण आणि विज्ञान-शोधाबद्दल प्रेम दाखवण्याची संधी देण्यात आली आहे. या प्रश्नमंजुषामध्ये सहभागी होण्यासाठी सर्व भारतीय नागरिकांना आमंत्रित करण्यात आले आहे.
प्रश्नमंजुषामध्ये सहभाग कसा घ्यायचा ?
प्रश्नमंजुषामध्ये सहभागी कसे व्हावे?
प्रश्नमंजुषा मध्ये सहभागी होण्यासाठी, सहभागींना https://www.mygov.in/ वर खाते तयार करावे लागेल. यामध्ये प्रोफाइल अपडेट करावे लागेल. अपूर्ण प्रोफाइल असलेले उमेदवार यासाठी पात्र असणार नाहीत.
योग्य OTP प्रविष्ट केल्यानंतर सहभागी ‘सबमिट’ बटणावर क्लिक करताच प्रश्नमंजुषा सुरू होईल. यामध्ये १० प्रश्नांची उत्तरे ३०० सेकंदात द्यायची आहेत.
निगेटिव्ह मार्किंग असणार नाही. प्रश्नमंजुषामध्ये सहभागी होण्यासाठी एकच मोबाईल क्रमांक आणि ईमेल आयडी एकापेक्षा जास्त वेळा वापरता येणार नाही. डुप्लिकेट नोंदी आढळल्यास पहिल्या प्रयत्नाची नोंद मूल्यमापनासाठी घेतली जाईल.
प्रश्नमंजुषामध्ये भाग घेतल्यानंतर सर्व सहभागींना सहभाग प्रमाणपत्र मिळेल. ते डाउनलोड करता येईल. विजेत्यांना रोख पारितोषिक दिले जाईल.
बक्षिसांचे स्वरूप कसे असणार ?
प्रथम विजेत्याला एक लाख रुपयांचे रोख पारितोषिक दिले जाईल. द्वितीय उपविजेत्याला ७५००० रुपये रोख रक्कम दिली जाईल. तृतीय विजेत्या स्पर्धकास ५० हजार रुपये दिले जातील.
यानंतर १०० सर्वोत्कृष्ट कामगिरी करणाऱ्यांना प्रत्येकी दोन हजार रुपयांची प्रोत्साहनपर पारितोषिके दिली जातील. त्यानंतर, पुढील २०० सर्वोत्कृष्ट कामगिरी करणाऱ्यांना प्रत्येकी १००० रुपयांचे प्रोत्साहनपर पारितोषिक दिले जाईल.