सिटी टाइम्स ऑनलाईन लाखनी | रानडुकराच्या हल्ल्यात महिला जखमी झाल्याची घटना लाखनी तालुक्यातील विहीरगाव येथे शुक्रवारी (ता. २५ ) दुपारी १ वाजता च्या सुमारास घडली. सरीता अशोक शहारे (४०) असे जखमी महिलेचे नाव आहे.
हेही वाचा | कराडे मास्तराच्या कानशिलात लगावल्याची ‘ ती ‘ बातमी निव्वळ अफवा
सदर जखमी महीला शेतात काम करीत असताना रानडुकराने तिच्यावर हल्ला केला. यात ती गंभीर जखमी झाली. दरम्यान तिला दिघोरी (मोठी) येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. घटनेची माहिती वनविभागाला देण्यात आली असून सरीता शहारे यांना उपचारासाठी आर्थिक मदत देण्याची मागणी कुटुंबीयांनी केली आहे.
हेही वाचा | आदिवासी आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना जेवणातून विषबाधा
तसेच विहीरगाव शेतशिवारात वन्यप्राण्यांचा हैदोस वाढल्याने मानवी जीवितहानी होऊ नये यासाठी वनविभागाने दखल घेवून वन्यप्राण्यांचा बंदोबस्त तातडीने करावा. अशी मागणी यावेळी तारेश शहारे यांनी केली आहे.