टीम सिटी टाइम्स लाखनी | प्राथमिक आरोग्य केंद्र केसलवाडा/ वाघ अंतर्गत प्राथमिक आरोग्य उपकेंद्र लाखनी शहरातील सावर/मुरमाडी येथे ग्राम पंचायतिच्या पुढाकारणे मारोती देवस्थानाच्या जागेवर प्राथमिक आरोग्य उपकेंद्राची इमारत मंजूर करून, आरोग्याची सेवा देण्याचे कार्य दि. 29 जुलै रोजी सुरु करण्यात आले आहे.
या उपकेंद्रात असणार, कर्तव्यदक्ष आरोग्य अधिकारी आरोग्य सेविका, आरोग्य सेवक, आणि अंशकालीन महिला परिचारिका, तसेच ओपिडी दैनंदिन सृरू असणार आहे. यामुळे सावरी वासियांना याचा चांगलाच फायदा मिळणार आहे. उपकेंद्र सुरु झाल्यामुळे नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरन दिसून येत आहे.
या आरोग्य उपकेंद्र उद्धाटन प्रसंगी जिल्हा परिषद सदस्य डॉ मनीषा निंबार्थे प.स. सदस्य विकास वासनिक, सावरीचे सरपंच सचिन बागडे, मंगेश धांडे, ग्रामसेवक संगीता मारवडे, आदित्य बागडे, मोहन रेहफाडे, भोजराम मांढरे, रीना बागडे, पुष्पा वंजारी, सिंधू नान्हे, सुरेखा चाचेरे, वंदना मेहर, संजीवनी नान्हे, नंदलाल चौधरी, ऋषि दिघोरे, देवस्थान समितीचे सदस्य रंजीत मेश्राम, भाष्कर बागडेm यांच्यासह गावातील अनेक मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते.