टीम सिटी टाइम्स लाखनी : राज्य सरकारने अवैध दारूविक्री वर बंदी केली असताना देखील लाखनी तालुक्यातील महत्वाचे ठिकाण असलेल्या मुरमाडी ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या ठवरे नगर झोपडपट्टीत अवैध दारूविक्री जोमात सुरू आहे.
लाखनी हे भंडारा जिल्ह्यातील शैक्षणिक व व्यापारी केंद्र आहे. शिक्षणाचे माहेरघर असलेल्या या नगरीत अवैध दारूविक्री व गांजा सारख्या अमली पदार्थांची नशाबाजी यांमुळे तरूणवर्ग व्यसनाच्या आधीन होत आहेत. झोपडपट्टीतील अवैध मोहफुलाच्या दारूविक्रीमुळे बरेचसे दारूपिणारे शौकीन या झोपडपट्टीत येवून यथेच्छ दारू पितात व मुख्य रस्त्यावरती येवून शिवीगाळ करतात.
यांमुळे आजूबाजूच्या परीसरातील महीलावर्गाला कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे. लाखनी पोलीस प्रशासनाचेया गंभीर बाबींकडे अक्षम्य दुर्लक्ष होतानी दिसत आहे. या सगळ्या अवैध धंदयांना पोलीसांचे अभयदान तर नाही ना अशी प्रतिक्रिया सामान्य नागरीकांनमध्ये चर्चा रंगली जात आहे.