टीम सिटी टाइम्स लाखनी : छत्रपती संभाजी युवा प्रतिष्ठान तर्फे मानेगाव/सडक येथे वैचारिक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. दरम्यान, कार्यक्रमाचे उद्धाटन आशा सिंगनजुडे यांच्यहस्ते कारण्यात आले. तर,
प्रमुख पाहुणे म्हणून नरेंद्र भांडारकर, मंगेश मेश्राम, प्रशांत गायधने, हरिभाऊ खवास, योगेश सिंगनजुडे, पंकज चेटुले, शंकर पाखमोडे, संदीप कावळे, कुंजना नेवारे, अंजली कुलसुंगे, बावनकुळे सर, नंदेश्वर मॅडम, गिदमारे यांची उवस्थिती होती.
जि.प प्राथमिक शाळा व एआयएम पब्लिक स्कुल मानेगाव/सडक यांच्यावतीने सांस्कृतिक कार्यक्रम, भाषणे, पोवाडे, व शिवगिते सादर करण्यात आले होते.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी क्रिष्णा गायधने, नेहाल कांबळे, सोनूलाल माकडे, विशाल रोकडे, आकाश निखाडे, देवा तितीरमारे, शाम कंकलवार, चुडामणी कंकलवार, ऋषभ आग्रे, गोलू कुलसुंगे, तुषार मेश्राम, राहुल सेलोकर मोंटी कामथे यांनी सहकार्य केले.
मानेगाव/सडक येथे वैचारिक शिवजयंती साजरी
