टीम सिटी टाइम्स साकोली | झाडीपट्टी सांस्कृतिक महोत्सव २०२४ नुकताच चंद्रपूर जिल्ह्यातील मुल येथे आयोजित करण्यात आला होता. झाडीपट्टीच्या कलावंतांना आणि झाडीपट्टीच्या साहित्याला वाव मिळावा हा सांस्कृतिक महोत्सव आयोजित करण्यामागे उद्देश.
या सांस्कृतिक सोहळ्यात साकोली तालुक्यातील जेष्ठ नाट्य कलावंत भूमाला कुंभरे आणि झाडीपट्टी रंगभूमीवरील कलावंत तथा लावणी सम्राज्ञी प्रियंका गायधने यांना गौरविण्यात आले. या गौरव सोहळ्यात पद्मश्री पुरस्कार प्राप्त जेष्ठ कलावंत डॉ. परशुराम खुणे, ज्येष्ठ कलावंत मीनाताई देशपांडे, प्रभाकर आंबोले, सुनील कुकुडकर, सिनेतारका वच्छालताई पुलकमवार आदी मान्यवर उपस्थित होते.
भूमाला कुंभरे आणि प्रियंका गायधने यांचे झाडीपट्टी रंगभूमीवर योगदान महत्त्वाचे ठरले आहे. कित्येक वर्षापासून त्यांनी या झाडीपट्टी रंगभूमीला कला सेवा दिली. त्यांचे हे योगदान लक्षात घेऊन झाडीपट्टी सांस्कृतिक महोत्सवात त्यांना गौरविण्यात आले. या गौरव पुरस्कार सोहळ्यात स्मृतीचिन्ह ,पुष्पगुच्छ, मानचिन्ह यांचा समावेश होता.
सांस्कृतिक मंत्रालय आणि जिल्हा प्रशासन चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमान १८, १९, २० फेब्रुवारी २०२४ रोजी झाडीपट्टी सांस्कृतिक महोत्सव २०२४ चे आयोजन करण्यात आले होते. या महोत्सवाच्या अध्यक्षस्थानी
जेष्ठ कलावंत पद्मश्री पुरस्कार प्राप्त जेष्ठ कलावंत पद्मश्री पुरस्कार प्राप्त डॉ. परशुराम खूणे तर उद्घाटक पाहुणे म्हणून सिने अभिनेत्री सोनाली कुलकर्णी उपस्थित होत्या. याप्रसंगी इतर मान्यवर म्हणून जेष्ठ कवियत्री अंजना खुणे, अभिनेता अक्षय कुलकर्णी, नाट्य निर्माते सदानंद बोरकर आदी मान्यवर उपस्थित होते.