टीम सिटी टाइम्स नवी दिल्ली | संसदेचे विशेष अधिवेशन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी बोलाविले काल दिनांक 18/09/2023 ला जुन्या संसद भवनात अधिवेशन घेण्यात आले व आज दिनांक 19/03/2023 ला सेंट्रल विस्टा ह्या नवीन संसद भवनात प्रवेश, अधिवेशन घेण्यात येणार आहे. तत्पूर्वी मीडियाच्या माध्यमातून मोदी सरकार 33% महिला आरक्षण विधेयक संसद भवनात आणणार असल्याचे बातम्या प्रसिद्ध होत आहेत.
अशातच बहुजन समाज पक्षाच्या नेत्या सृश्री मायावती यांनी आज पत्रकार वार्ता घेतली व मोदी सरकार आणत असलेल्या महिला आरक्षण विधेयकास बसपाच्या संपूर्ण पाठिंबा असून त्यात त्यांनी काही मागण्या केलेले आहेत त्यामध्ये प्रामुख्याने राज्यसभा आणि लोकसभा यामध्ये महिलांना 33% आरक्षणा एवेजी 50 टक्के आरक्षण देण्यात यावे.
हेही वाचा | प्रियंका गांधी आणि मायावती यांच्यात बैठक | बसपा , इंडिया आघाडीची युतीची शक्यता
महिला आरक्षणात एससी एसटी व ओबीसी महिलांना राखीव आरक्षण ठेवावे जेणेकरून ह्या वर्गातील महिलांना पुरेपूर प्रतिनिधित्व मिळेल भारतीय जनता पक्षाने काँग्रेस प्रमाणे आपली जातीवादी मानसिकता सोडून एससी एसटी ओबीसी महिलांना न्याय द्यावा असेही मागणी त्यांनी केली.
पत्रकार परिषदेत त्या बोलत असताना त्यांनी सांगितलं की महिला आरक्षणाची बसपा ची मागणी अनेक वर्षापासून आहे खऱ्या अर्थाने महिलांना आरक्षण देऊन भारतीय संविधानाचे निर्माते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची स्वप्नपूर्ती होणार आहे परंतु भाजपाला आपली जातीयवादी मानसिकता सोडून एससी एसटी महिलांना न्याय द्यावा असेही मागणी त्यांनी पत्र परिषदेत दिल्ली या ठिकाणाहून केली.
त्यानंतर त्या बोलत असताना हे सर्व काही असताना जरी महिला आरक्षणाचा बिल संसदेत आला त्या आरक्षणाला बहुजन समाज पक्ष पूर्णतः पाठिंबा देऊन सर्व समाजाच्या महिलांना न्याय देण्याचा प्रयत्न करेल तसेच इतरही पक्षांनी
आपली जातीयवादी मानसिकता सोडून या बिलाला समर्थन द्यावे असेही त्या बोलल्या आज अचानक पत्रकार परिषद घेऊन महिला आरक्षणाला पाठिंबा देणाऱ्या देशातील त्या पहिल्या नेत्या ठरल्या आता अशा अनेक मागण्या सृश्री मायावती यांनी केले असल्या तरी त्या मागण्या कुठपर्यंत पूर्ण केल्या जातात मोदी सरकारला गांभीर्याने घेईल का हे विशेष