सिटी टाइम्स ऑनलाईन भंडारा | मुख्यमंत्री वैद्यकीय निधीतून गोरगरिबांवरील उपचारांसाठी मदत हवी असल्यास अर्ज करण्यासाठी आता राज्य शासनाने एक मोबाइल नंबर जाहीर केला आहे. ८६५०५६७५६७ या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधल्यास मुख्यमंत्री साहाय्यता निधीमधून विविध शस्त्रक्रिया, आजारांवरील वैद्यकीय उपचारांसाठी विशिष्ट रक्कम मदत म्हणून दिली जाते. यासाठी अर्जही उपलब्ध करून दिला आहे.
उपचारांसाठी मुख्यमंत्री वैद्यकीय निधीतून मिळते मदत
रुग्ण ज्या रुग्णालयात भरती आहे. त्या रुग्णालयातील कोटेशन मागवण्यात येते. त्यानुसार मदत केली जात असते.
वार्षिक उत्पन्न १.६० लाख हवे रुग्णाला मुख्यमंत्री साहाय्यता निधीची मदत हवी असल्यास त्याचे उत्पन्न मर्यादा १ लाख ६० हजारांच्या मर्यादित असावे लागते. यासाठी तहसीलदारांनी दिलेले उत्पन्नाचे प्रमाणपत्र जोडावे लागते.
अर्जासाठी या मोबाइलवर द्या मिस कॉल, रुग्णाला उपचारांसाठी आर्थिक मदतीची आवश्यकता असल्यास अर्ज करावा लागतो. तो अर्ज ८६५०५६७५६७ या क्रमांकावर मिस कॉल दिल्यास अर्ज मोबाइलवर उपलब्ध होतो, हा अर्ज ऑनलाइन अपलोड केल्यास पुढील प्रक्रिया सुरु होते.