टीम सिटी टाइम्स लाखनी | उच्च माध्यमिक शालांत परीक्षेच्या निकाल दि. २१ मे रोजी मंगळवार दुपारी एक वाजताच्या दरम्यान माध्यमिक शालांत परीक्षा पुणे मार्फत जाहीर करण्यात आला. यात समर्थ कनिष्ठ विज्ञान महाविद्यालय लाखनीचा शंभर टक्के निकाल लागला असून ९१ विद्यार्थ्यांपैकी ९१ उत्तीर्ण झाले.
गोविंद कनिष्ठ विज्ञान महाविद्यालय पालांदूर येथील शंभर टक्के निकाल लागला असून ११७ विद्यार्थी पैकी १९ विद्यार्थी प्राविण्य श्रेणीत उत्तीर्ण झालेले आहेत. समर्थ महाविद्यालय येथील शलाका पराड या विद्यार्थिनीला ५६९ मिळत ९४.८३% गुण प्राप्त करून ती तालुक्यातून प्रथम आली आहे.
समर्थ महाविद्यालय लाखनी येथील कला वाणिज्य आणि विज्ञान या तीनही विभागाच्या एकत्रित निकाल ९१.२०% लागला असून यासोबतच ज्ञानेश्वर कनिष्ठ कला महाविद्यालय सालेभाटा येथील ८८.४६ टक्के निकाल लागला आहे. उच्च माध्यमिक शालांत परीक्षेच्या निकालामुळे विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झालेले आहे तसेच आता वरिष्ठ महाविद्यालयात प्रवेशासाठी विद्यार्थ्यांची गर्दी होणार आहे.
लाखनी तालुक्यातील निकालाची टक्केवारी बघता मुलींनी यावर्षी बाजी मारलेली आहे. निकाल जाहीर होताच राष्ट्रीय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आल्हाद भांडारकर, समर्थ महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ दिगंबर कापसे, समर्थ विद्यालयाचे मुख्याध्यापक अनिल बडवाईक, गोविंद कनिष्ठ विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य गोवर्धन शेंडे यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.