टीम सिटी टाइम्स लाखनी | नातेवाईकांचा भांडण सुरु असतांना भांडणात शिवीगाळ दिल्याने एका युवकाने चक्क धारदार ब्लेडने वार करून गंभीर जखमी केल्याची धक्कादायक घटना लाखनी तालुक्यातील दैतमांगली येथे(दि. २१) जुलै रोजी रात्री आठ वाजताच्या सुमारास घडली.धर्मेंद्र काशीराम लोणारे(वय ४२ रा. दैतमांगली) असे जखमीचे नाव असून ज्ञाणेश्वर दसराम लोणारे (वय ५१) व गौरव ज्ञाणेश्वर लोणारे(वय २२) दोन्ही रा. दैतमांगली असे आरोपीची नावे आहेत.
या घटनेतील जखमी डोडमाझरी (टेकेपार) येथून स्वगावी परत आला असता, नात्यातील गौतम लोणारे व ज्ञाणेश्वर लोणारे या दोघांचे आपसात भांडण सुरु होते. दरम्यान, या घटनेतील आरोपीतांनी जखमीस शिवीगाळ करीत भांडण केले. आरोपी बापलेक असून, मुलाने हातात असलेल्या ब्लेड सारख्या धारदार शस्त्राने जीविनीशी ठार मारण्याच्या हेतूने गळ्यावर वार करून प्राणघातक हल्ला केला. यामध्ये धर्मेंद्र लोणारे यास गंभीर दुखापत झाली.
याप्रकरणी धर्मेंद्र लोणारे याच्या तक्रारीवरून तथा वैदकीय अहवालावरून लाखनी पोलिसांनी दोन्ही आरोपी बापलेकावर कलम १०९, ३५२, ३५१ (२) ३ (५) भारतीय न्याय संहिता अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून सहाय्य्क पोलीस अधीक्षक सुशांत सिंग,पोलीस निरीक्षक नरेंद्र निस्वादे, सहाय्य्क पोलीस निरीक्षक राजेंद्र गायकवाड यांनी घटनास्थळी भेट दिली. घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अशोक बोडे करीत आहेत.