टीम सिटी टाइम्स | लाखनी येथील पोलिस ठाण्याच्या हद्दीतील ६२ गावापैकी २४ गावातील ४२ गणेश मंडळांकडून ४२ सार्वजनिक गणपतींची मंगळवारी (ता.१९) ला सायंकाळी भक्ती भावाने स्थापना करण्यात आली असून त्यातील १७ गावात “एक गाव एक गणपती” आहे.
शहरात ८ तर ग्रामीण परिसरात ३४ गणपतीची स्थापना करण्यात आली असल्याचे पोलिस हवालदार सुभाष राठोड, पोलिस अमलदार पियूष बाच्छिल यांनी कळविले आहे.
स्वातंत्र्य पूर्व काळात लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी सार्वजनिक गणेशोत्सवास सुरू केली होती. ती १०० वर्षानंतर आजही कायम आहे. गणेशोत्सव शांततेत व निर्विघ्नपणे पार पाडण्याची जबाबदारी गणेश मंडळांनी स्वीकारली असली तरी पोलिस निरीक्षक मिलिंद तायडे यांचे मार्गदर्शनात आवश्यक त्या ठिकाणी सुरक्षा व्यवस्था करण्यात येणार आहे.
हेही वाचा | अवैध रेती वाहतूक करणारे ३ ट्रॅक्टर पकडले १५ लाख ९ हजाराचा मुद्देमाल जप्त
गणेशोत्सवात आकर्षक सजावट, भक्तिभाव आणि समाज प्रबोधन कार्यक्रमामुळे अनेक भाविक दर्शनासाठी येत असतात त्यामुळे रस्त्यावर वर्दळ वाढते आणि वाहतुकीचा प्रश्न निर्माण होतो. गणेशोत्सव शांततेत व सुरळीत पार पडावा. या करिता तालुका प्रशासन व पोलिस दल सज्ज आहेत.
गणेश विसर्जन व ईद-ए-मिलाद एकाच दिवशी येत असल्याने मिरवणुकीमध्ये कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये. या करिता उपविभागीय पोलिस अधिकारी सुशांत सिंग व पोलिस निरीक्षक मिलिंद तायडे यांचे मार्गदर्शनात पोलिस ठाणे लाखनी येथे गणेश मंडळ पदाधिकारी व मुस्लिम मौलवी आणि प्रतिष्ठित व्यक्तींची बैठक आयोजित करून
गणेशोत्सव शांततेत पार पाडण्याचे आवाहन करून कलम १४९ सीआरपीसी नुसार नोटीस बजावण्यात आली. यातील नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
हेही वाचा | संविधानाच्या प्रतीतून समाजवादी धर्मनिरपेक्ष शब्द गायब | काँग्रेसचा आरोप
लाखनी पोलिस ठाण्याच्या हद्दीत २४ गावातील ४२ गणेश मंडळांकडून शहरी भागात ८ तर ग्रामीण भागात ३४ गणपतींची स्थापना केली आहे. त्यात १७ गावात “एक गाव एक गणपती” आहेत.
गणेशोत्सव शांततेत पार पडावे या करिता तहसीलदार दत्तात्रय निंबाळकर, गटविकास अधिकारी अरुण गिरेपुंजे, पोलिस निरीक्षक मिलिंद तायडे यांचेसह पोलिस प्रशासन उपाययोजना करीत असल्याचे पोलिस हवालदार सुभाष राठोड, पोलिस अमलदार पियूष बाच्छिल यांनी कळविले आहे.
या गावात आहेत “एक गाव एक गणपती”
लाखनी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील सावरी, रेंगेपार/कोठा, नीलागोंदी, सामेवाडा, बरडकिन्ही, मेंढा, पेंढरी, गुंथारा, राजेगाव(एमआयडीसी), नान्होरी, चीचगाव, मोरगाव, खेडेपार, कनेरी/दगडी, बाम्हनी, खुटसावरी, गोंडसावरी ह्या १७ गावात “एक गाव एक गणपती” ची स्थापना करण्यात आली आहे .